“सिंधुदुर्गची नवी कविता” नाथ पै ज्ञानप्रबोधिनी करूळ प्रशालेस भेटरुपी देण्यात आला | “Sindhudurgchi Navi Kavita” was gifted to Nath Pai Gyanprabodhini Karul Prashala

satyawan-satam-navodit-kavi-janavali-gavthanwadi

सिंधुदुर्गातल्या मातीत अनेक साहित्यिक जन्माला आले आहेत…. संपूर्ण जगाला या मातीने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. लाल मातीतील हे कलावंत प्रतिभावान आहेतच. माती पासून दूर असूनही त्यांनी या मातीशी असलेली नाळ कधीच न तोडता सातत्याने लिखित साहित्याचे जतन आणि संवर्धन आपल्या कलाकृतीतून साकारले आहे.. विविध शाळांना या साहित्यकृतीची जाणीव व्हावी. साहित्यातील महत्त्वाच्या पैलूंची जडणघडण शालेय जीवनात व विद्यार्थी दशेत व्हावी याकरिता जानवली गावातील कवी श्री सत्यवान सहदेव साटम यांनी लिहिलेल्या कवितांचा ग्रंथ… नाथ पै ज्ञानप्रबोधिनी करूळ प्रशालेस भेटरुपी देण्यात आला…… यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री विनोद नारायण मेस्त्री…

Read More | पुढे वाचा

जीवेत शरद: शतम् शतम् जानवली गावातील नवोदित कवी सत्यवान सहदेव साटम | Jivet Sharad: Shatam Shatam Janavali village rising poet Satyawan Sahadeva Satam

navodit-kavi-satyawan-satam

जानवली गावातील नवोदित कवी म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण करण्यात यथायोग्य प्रयत्नशील असलेले सत्यवान सहदेव साटम यांचा आज वाढदिवस त्यानिमीत्ताने त्यांच्या या कविता अथवा काव्य लेखन या क्षेत्रात एक दिशा मिळाली ती सिंधुदुर्गातील नवोदित कवींचा “सिंधुदुर्गची नवी कविता” हा काव्यग्रंथ २३ जूनला मालवण येथे समाज संवाद साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. रणधीर शिंदे व संमेलनाचे प्रमुख पाहुणे समीक्षक प्रा. दत्ता घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत या संग्रहाचे प्रकाशन झालेले आहे. ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा ग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून या ग्रंथाचे संपादन समीक्षक…

Read More | पुढे वाचा

सत्यवान सहदेव साटम यांच्यातर्फे “सिंधुदुर्गची नवी कविता” कविता संग्रह भेट म्हणून देण्यात आला | A collection of poems “Sindhudurgchi Navi Kavita” was gifted by Satyawan Sahdev Satam

satyawan-satam-vidhyamandir-kankavali-with-kavitasangrah

दिनांक २६ जुन २०२४ रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची १५० वी जयंती विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवली येथे साजरी करण्यात आली होती.तसेच याच दिवशी योगायोगाने श्री. सत्यवान सहदेव साटम यांचाही वाढदिवस होता श्री. सत्यवान सहदेव साटम व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव कवी एकत्र येऊन अति उत्तम/उत्कृष्ट कवितांचं लिखाण करून या सर्व कविता एकत्र करून श्री अजय कांडर नामांकित कवी यांच्या संकल्पनेतून कविता संग्रह तयार केला आहे.वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे.कांबळे यांच्याकडे कविता संग्रह भेट स्वरुपात देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शिक्षक वर्ग.💐💐💐💐💐 विद्यामंदिर कणकवली प्राथमिक विभागाला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ॓सिंधुदुर्गची…

Read More | पुढे वाचा

Majhi Mayboli | माझी मायबोली

satyawan-s-satam

माझी मायबोली मराठी हाय तिची कुणाला तोडच नाय तिचा रुबाब न्यारा तिचा सहवास प्यारा रस्व ,दीर्घ ,काना, मात्रा अलंकाराचा साज तिला व्याकरणाचा तर उच्चांक झाला कुणालाही सहज कळावी वाटेल तशी वळवावी शब्दात हिच्या धार अशी प्रहार करण्यास तलवार जशी कथा, कादंबऱ्या, काव्यात हिच्या नाद नाही करायचा डंका आहे सर्वत्र पुन्हा माझ्या मायबोली मराठीचा माझ्या मायबोली मराठीचा —- सत्यवान सहदेव साटम गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग.  फेसबुक लिंक

Read More | पुढे वाचा

Mann nahi ho kamjor | मन नाही हो कमजोर

meditation

हात-पाय जरी असले अपंग मन नाही हो कमजोर कामावरची निष्ठा देई मला बळ बुध्दीचा करुन वापर सहज करतो मी नय्या पार कुणाच्या निंदेचा नाही पडत, मजवर असर माझा मी खंबीर एकदा वाटलं कसलं हे जिवन हडहड करावं ज्यानत्यानं मग मनानं विचार केला मी नाही हा जनच खरा अपंग ——- सत्यवान साटम गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग.  फेसबुक लिंक

Read More | पुढे वाचा

Majhi Malvani | माझी मालवणी

Satyawan Satam

मालवणी बोलीचो गोडवो ज्याका कळलो तो मालवणीकडेच वळता मराठी भाषा वळवूची तशी वळता पण मालवणीचो ज्याका गंध आसा त्याकाच ती कळता याक मात्र खरा हा आमचो मालवणी माणूस मुळातच प्रेमळ आणि लाजाळू दुसऱ्याची भाषा मोठेपणान बोलाक जाता आणि आपली भाषा बोलाची येळ ईली की मुग गिळान गप बसता चार लोक एकठय ईले कि त्यांचा एंडुगुंडु कान लावन ऐकता मात्र भावकीतलो कोणी जवळ ईलो तर त्याका ‘काय कसं हाय’ असा देशी भाषेत ईचारता ह्या सगळा आता थांबाक व्हया मालवणी माणसानू तुम्ही मालवणीतच बोलाक व्हया आमची माय मालवणी ह्या दाखवुकच व्हया ——-…

Read More | पुढे वाचा