जानवली गाव हे मुंबई गोवा महामार्गावर वसलेले असून १२ वाड्यांचे हे गाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. जानवली गाव हे तसे कनकवली तालुक्याचा भाग असून कनकवली शहरा लगतच आहे दोघांच्या मध्ये जानवली नदी आहे. मुबलक पाणी उपलब्ध असलेले शेती प्रधान तसेच पूर्वजांच्या रूढी परंपरेचा वारसा जपणारे असे हे गाव येथे येण्याची पर्यटकांना देखील भुरळ पडलीनाही तर नवलच. जानवली गाव तसे सर्व सुख सोयींनी समृद्ध असून विकासाच्या दृष्टीने देखील ग्रामस्थांची प्रयत्नांची पराकाष्टा चालूच असते. जानवली गाव हे देव लिंगेश्वर व देवी पावणाई यांच्या आशीर्वादाने तसेच यांच्या कृपादृष्टीने सर्व स्तरावर आपला ठसा उमटवीत…
Read More | पुढे वाचाDay: November 23, 2022
जानवली देवाचे वार्षिक २०२२
जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक हे दर वर्षी देवदिवाळीच्या दरम्यान म्हणजेच देवदिवाळीच्या आदल्या दिवशीची दिव्याची जत्रा हि आजूबाजूचा पंचक्रोशीतच नव्हे तर मुंबई ते गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, किंबहुना भारतात हि बऱ्याच अंशी परिचित असून भाविकांची अलोट गर्दी येथे पाहावयास मिळते. जानवली गावात देवाच्या वार्षिकाला सुरुवात एकादशीला होते विविध स्थळांवर देवांचे ग्रामस्थांसहित भेट देऊन तेथील महाप्रसादाची व्यवस्था स्थानिकांमार्फत केली जाते व उपस्थित सर्व भाविकांना या महाप्रसादाचा लाभ घेता येतो.
Read More | पुढे वाचा