माझी मायबोली मराठी हाय तिची कुणाला तोडच नाय तिचा रुबाब न्यारा तिचा सहवास प्यारा रस्व ,दीर्घ ,काना, मात्रा अलंकाराचा साज तिला व्याकरणाचा तर उच्चांक झाला कुणालाही सहज कळावी वाटेल तशी वळवावी शब्दात हिच्या धार अशी प्रहार करण्यास तलवार जशी कथा, कादंबऱ्या, काव्यात हिच्या नाद नाही करायचा डंका आहे सर्वत्र पुन्हा माझ्या मायबोली मराठीचा माझ्या मायबोली मराठीचा —- सत्यवान सहदेव साटम गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग. फेसबुक लिंक
Read More | पुढे वाचाMonth: February 2023
Cashews: The Favorite Fruit from Sindhudurg, Maharashtra | काजू: सिंधुदुर्ग, महाराष्ट्रातील आवडते फळ
शतकानुशतके काजू हे एक आवडते फळ आहे आणि त्यांचा वापर जगभरात पसरला आहे. हे स्वादिष्ट आणि पौष्टिक नट अथवा बी मूळचे ब्राझीलचे आहेत परंतु आता भारतासह अनेक देशांमध्ये हे पिकवले जातात. उच्च-गुणवत्तेचे काजू शोधण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यात हे ठिकठिकाणी आढळून येतात. सिंधुदुर्ग हे काजू लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, जे जगातील सर्वोत्तम काजूचे उत्पादन करतात. जिल्ह्याची सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान हे काजू पिकवण्यासाठी योग्य आहे आणि सिंधुदुर्गातील काजूच्या बागा हे पाहण्यासारखे असते. सिंधुदुर्गातील काजूची झाडे मोठी आणि सुस्थितीत आहेत आणि त्यांच्या फांद्यांना लटकलेली पिकलेली फळे…
Read More | पुढे वाचाPapaya or pawpaw is one of the healthiest fruits in India | पपई हे भारतातील आरोग्यदायी फळांपैकी एक आहे
पपई, एक उष्णकटिबंधीय फळ ज्याचा जगभरात मोठ्या प्रमाणावर आनंद घेतला जातो, हे दक्षिण अमेरिकेतील मूळ फळ आहे. तथापि, आता हे भारतातील तसेच महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह जगभरातील अनेक उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये घेतले जाते. पपई, ज्याला पापा किंवा पावपाव (pawpaw) म्हणून देखील ओळखले जाते, ते केवळ स्वादिष्टच नाही तर अनेक आरोग्य फायदे देखील देते. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गोव्याच्या सीमेला लागून आहे. प्रदेशातील अनुकूल हवामान आणि मातीची परिस्थिती पपई पिकवण्यासाठी एक अनुकूल स्थान मानले जाते. या फळाची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते, स्थानिक शेतकरी गोड आणि आंबट…
Read More | पुढे वाचाMann nahi ho kamjor | मन नाही हो कमजोर
हात-पाय जरी असले अपंग मन नाही हो कमजोर कामावरची निष्ठा देई मला बळ बुध्दीचा करुन वापर सहज करतो मी नय्या पार कुणाच्या निंदेचा नाही पडत, मजवर असर माझा मी खंबीर एकदा वाटलं कसलं हे जिवन हडहड करावं ज्यानत्यानं मग मनानं विचार केला मी नाही हा जनच खरा अपंग ——- सत्यवान साटम गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग. फेसबुक लिंक
Read More | पुढे वाचाMaharashtra State Board 12th – HSC Exam 2023 | आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा
Maharashtra State Board 12th Exam: सेंटर्सवर भरारी पथकं तसेच शेवटी 10 मिनिटांची वाढ; आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा आजपासून अर्थात २१ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. यंदा कोरोना सारख्या महामारीचे सावट नसल्याने (तीव्रता फार कमी असल्याने) शिक्षणही ऑफलाईन झाले आहे त्यामुळे परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होणार आहे आणि २१ मार्च २०२३ पर्यंत संपणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट्स त्यांच्या शाळांकडून किंवा जुनिअर/सिनिअर कॉलेजेस कडून मिळाले आहेत. कृपया विध्यार्थ्यानी हॉल तिकिटावरील संपूर्ण माहिती बरोबर आहे…
Read More | पुढे वाचाShri Kunkeshwar Yatra Festival Mahashivaratri 2023 | कुणकेश्वर यात्रा (महाशिवरात्री उत्सव) कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरचा महाशिवरात्री यात्रोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कुणकेश्वर यात्रा महाराष्ट्रात पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात (फेब्रुवारी) महाशिवरात्री दिवशी साजरी केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राकाठी वसलेले कुणकेश्वर हे गाव त्याच्या किनाऱ्यावरील प्राचीन अर्थात पुरातन शिवमंदिरासाठी आणि त्याच्या लगतच्या समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाते. हा प्रदेश हापूस आंब्याच्या लागवडीसाठी आणि पुरवठ्यासाठी देखील जगभरात प्रसिद्ध आहे. असंख्य भक्त ही यात्रा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील कुणकेश्वर मंदिरात येऊन महादेवाचा आशीर्वाद घेऊन जातात. या वार्षिक जत्रा आणि उत्सवात शेकडो नव्हे तर लाखो भाविक येतात. या कालावधीत आयोजित केलेल्या जत्रेला आणि उत्सवातही लोकांची झुंबड उडते. या प्रसंगी मंदिराला दिवे, पाने, फुले…
Read More | पुढे वाचाShri Shiv Stuti Marathi | महाशिवरात्री निमित्त श्री शिवस्तुती महादेवाचे स्मरण आवर्जून करावे
महाशिवरात्री निमित्त आज आपल्या जानवली गावाचा राजा आपले ग्रामदैवत महादेव श्री लिंगेश्वर देवाची भाविक आपल्या जानवली गावातील भक्तगण कुठे असतील तिथून देवाची आठवण करतात. देवाच्या नाम समरणात आनंद अनुभवणारे भक्तगण साता समुद्रापार देखिल आपल्या देव लिंगेश्वराची मनोमन सेवा करतात त्यांच्या करिता आपल्या देव लिंगेश्वरासाठी शिवस्तुती उपलब्ध करीत असून शिवभक्तांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. श्री शिवस्तुती Shiv Stuti Marathi कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनांतकारी ।…
Read More | पुढे वाचाBest wishes to Atharva, son of Dainik Saamana news editor Rajnish Rane, on this auspicious marriage | वधू वराला आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत खास उपस्थित होते
दैनिक सामना चे वृत्त संपादक रजनीश राणे यांचा पुत्र चि. अथर्व याचा शुभ विवाह! जानवली घरटनवाडी येथील रहिवासी दैनिक सामना चे वृत्त संपादक रजनीश राणे यांचा पुत्र चि. अथर्व याचा शुभ विवाह चि.सौ. का. पूजा हिच्याशी संपन्न झाला. यावेळी वधू वराला आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत खास उपस्थित होते. दैनिक सामना चे वृत्त संपादक रजनीश राणे हे आपल्या जानवली गावचे सुपुत्र असून घरटन वाडीतील रजनीश राणे यांचे चिरंजीव अथर्व याचा विवाह सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला या लग्न सोहळ्याला अनेकांनी उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद दिले. त्यात विशेष…
Read More | पुढे वाचाMajhi Malvani | माझी मालवणी
मालवणी बोलीचो गोडवो ज्याका कळलो तो मालवणीकडेच वळता मराठी भाषा वळवूची तशी वळता पण मालवणीचो ज्याका गंध आसा त्याकाच ती कळता याक मात्र खरा हा आमचो मालवणी माणूस मुळातच प्रेमळ आणि लाजाळू दुसऱ्याची भाषा मोठेपणान बोलाक जाता आणि आपली भाषा बोलाची येळ ईली की मुग गिळान गप बसता चार लोक एकठय ईले कि त्यांचा एंडुगुंडु कान लावन ऐकता मात्र भावकीतलो कोणी जवळ ईलो तर त्याका ‘काय कसं हाय’ असा देशी भाषेत ईचारता ह्या सगळा आता थांबाक व्हया मालवणी माणसानू तुम्ही मालवणीतच बोलाक व्हया आमची माय मालवणी ह्या दाखवुकच व्हया ——-…
Read More | पुढे वाचाGanpati Atharvashirsha | गणपति अथर्वशीर्ष (गणपति उपनिषद)
संकष्टी चतुर्थी दिवशी गौरीपुत्र, गौरीनंदन श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व इच्छा आपल्या मनोकामना पूर्ण होतात. असे म्हणतात की जो कोणी गणपती बाप्पाची खऱ्या मनाने भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार अर्थवशीर्ष पठण करून गणरायाची मनोभावे प्रार्थना करावी. श्रीमहागणपत्यथर्वशीर्षम् ॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ नमस्ते गणपतये ॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ॥ त्वमेव केवलं कर्तासि ॥ त्वमेव केवलं धर्तासि ॥ त्वमेव केवलं हर्तासि ॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रम्हासि ॥ त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥ १ ॥ ऋतं वच्मि ॥ सत्यं वच्मि ॥ २ ॥ अव त्वं…
Read More | पुढे वाचा