परमहंस भालचंद्र महाराज १२० वा जन्मोत्सव सोहळा २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ परमहंस सच्चीदानंद सद्गुरू भालचंद्र महाराज ही एक देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण करणारे भालचंद्र बाबा जे अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते ते भक्तांचे तारणहार झाले. बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधीस्थानाच्या दर्शनाने असंख्य भाविकांना, भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर सातासमुद्रापार देखील बाबांचे भक्त आपणास कृपाछत्र लाभावे याकरिता परमहंस भालचंद्र बाबांच्या तपश्चर्यास्थान व समधीस्थानाच्या दर्शनाकरिता आश्रमात आवर्जून येत…
Read More | पुढे वाचा