आज २३ जानेवारी २०२५, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात बाळासाहेब ठाकरे यांची ९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवसेनेचे संस्थापक, एक परखड विचारवंत, कट्टर हिंदुत्ववादी नेता आणि दमदार वक्ता असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या समर्थकांनी हिंदूहृदयसम्राट आणि टायगर ही बिरुदं बहाल केली. त्यांचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जाणवतो. बाळासाहेब ठाकरे: एक प्रभावशाली नेतृत्व २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात जन्मलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे होते. त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे प्रसिद्ध समाजसुधारक आणि विचारवंत होते. आपल्या वडिलांकडूनच बाळासाहेबांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. व्यंगचित्रकार म्हणून…
Read More | पुढे वाचा