शिवाजी महाराजांची जयंती: ग्रेगोरियन कॅलेंडर आणि हिंदू पंचांगानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पराक्रमामुळे आणि शौर्यामुळे त्यांना केवळ महाराष्ट्रात, संपूर्ण भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात मोठा आदर मिळतो, शिवभक्त तसेच शिवप्रेमी सदैव नतमस्तक होतात . त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवाजी महाराजांची जयंती दोन प्रमुख तारखांना साजरी केली जाते: ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार: 19 फेब्रुवारी हिंदू पंचांगानुसार: फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया तिथी या दोन्ही तारखांना त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले जाते. मात्र, हिंदू पंचांगानुसार तारखेत बदल होऊ…
Read More | पुढे वाचा