मुंबई, दिनांक: २४ मार्च २०२५ मुंबईतील स्वामीराज प्रकाशन आणि कणकवलीतील प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले असून संमेलनाध्यक्षपदी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभ्यासक, ज्येष्ठ अभिनेता प्रमोद पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचा स्मृती जागर करणारे हे एकदिवसीय साहित्य संमेलन गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर मध्ये संपन्न होणार आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत या संमेलनात नारायण सुर्वे यांच्या गीतांचे शाहिरी गायन, काव्य अभिवाचन, परिसंवाद, मुलाखत, निमंत्रितांचे कवी संमेलन, एकांकिका…
Read More | पुढे वाचा