आपल्या सर्व पोलीस परिवारातील कुटुंबीयांना कळविण्यात आनंद होत आहे की, उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२३, रविवार रोजी आपण आयोजित केलेल्या आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर या कार्यक्रमाचे उद्घाटन हे आपला पोलीस पुत्र ओम साटम व त्याचे पालक यांच्या हस्ते होणार आहे आणि ही आपल्या पोलीस परिवारासाठी खरच खूप कौतुकाची व गौरवास्पद गोष्ट आहे की १६ वर्षाचा हा आपला पोलीस पुत्र ओम साटम आज त्याच्या स्विमिंगच्या क्षेत्रात गगन भरारी घेत आहे, आणि त्या निमित्तानेच एवढ्या कमी वयात त्याने आपल्या या कार्यक्रमाला उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून उद्घाटन करण्याचे आपले आमंत्रण स्वीकारले देखील आहे…
तरी आपल्या पोलीस परिवारातील सर्वच ज्येष्ठ नागरिक, आपल्या माता-भगिनी व आपले बंधू सर्वांनीच उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी…
असे आवाहन आयोजकां कडून करण्यात आले होते. जानवली गावातील गावठण वाडीतील ओम साटम याचे हार्दिक अभिनंदन तसेच या उभरत्या खळाडूला खूप खूप शुभेच्छा.