Business / व्यवसाय

business

जानवली गाव तसं मुंबई गोवा महामार्गावर असल्याने अनेक उद्योगधंदे वा व्यवसायासाठी येथील वातावरण व परिसर हा पोषक आहे कणकवली सारख्या तालुक्याच्या अगदी लागूनच असल्याने उद्योगाच्या अनेक संधी येथे उपलब्ध आहेत किंबहुना बऱ्याच अंशी त्या दिशेने वाटचाल होत असताना पहावयास मिळते

गावात पेट्रोल पंप आहे एलपीजी गॅस पंप आहे. तारांकित हॉटेल आहे नवं नवीन कॉलनी तसेच इमारतींचे प्रकल्प उभे राहत आहेत.

अनेक बचत गट कर्यरत असून त्यांचे देखील काजू प्रोसेस प्रकल्प, शेती फळबाग प्रकल्प, मालवणी खाद्य पदार्थ निर्मिती व विक्री असे अनेक मार्गाने व्यवसायावर भर दिलेला पाहावयास मिळतो.

शेती हा जरी मुख्य व्यवसाय असला तरी अनेक जोडधंदे करताना तरुण वर्ग प्रगतीच्या दिशेने जात असल्याचे आढळून येते.

गावाप्रमाणेच अनेक मान्यवर ज्यांनी मुंबई सारख्या मोठं मोठ्या नामंकित शहरात व्यवसाय सुरु करून आपले पाय भक्कम रोवल्याचे दिसून येते.

लॉजिस्टिक, पैठणी, पोल्ट्री, हॉटेल, आयात निर्यात, इलेक्ट्रॉनिक्स, सीज फायर, फॅब्रिकेशन, बुटीक, डिझाईनिंग, प्रिंटिंग असे अनेक विविध छोटे मोठे उद्योग धंदे नावारूपाला येत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments