Anganewadi Jatra-Yatra 2024 | २ मार्च २०२४ या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा!

devi-bharadi-yatra-2024

भारतातील हिंदू संस्कृती मध्ये जत्रा अर्थात यात्रा या पारंपरिक प्रथेला अनन्य साधारण महत्व आहे. किंबहुना महाराष्ट्रात जत्रा किंवा यात्रा हा एक श्रद्धेचा उत्सव, सिंधुदुर्ग वासियांकरिता जत्रा म्हणजे दसरा दिवाळीच जणू, असंख्य खेडोपाड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची/यंत्रांची उत्सुकता प्रत्येक कोकणस्थ मांसल असतेच हे चित्र साधारण दर वर्षी पाहायला मिळते. मग त्यात कितीही अडथळे असले किंवा आडी अडचणी असल्या तरी त्यावर मात करून विशेषतः मालवणी माणूस हा हमखास आपल्या ग्रामदैवताच्या, कुणकेश्व्रच्या तसेच आई भराडी देवीच्या जत्रेला आवर्जून येतोच.

सिंधुदुर्गातील विशेष महत्व असलेल्या या जत्रा सध्या स्थानिकांपुरताच आवडीचा किंवा महत्वाचा विषय राहिलेला नसून सम्पूर्ण महाराष्ट्र्र राज्य, परराज्य, देश विदेशात देखील अनेकांसाठीच हा मोठ्या श्रद्धेचा, भाविकांसाठी जिव्हाळ्याचा आणि रूढी परंपरेचा विषय झालेला आहे. किंबहुना आजकालच्या डिजिटल अथवा व्हाट्सअँप च्या युगात असेच काही सण, उत्सव तमाम जनतेला एकत्रित आणण्याची परंपरा जोपासत आहेत. महाराष्ट्र आणि परदेशात असणाऱ्याही सिंधुदुर्ग वासीय म्हणा अथवा मालवणी म्हणा किंवा कोकणवासियांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या आई श्री भराडी देवीच्या जत्रेची यंदाची तारीख हि २ मार्च २०२४ रोजी देवीच्या कौला नुसार निश्चित झाली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील पवित्र अशा आंगणेवाडी येथील माता माउली भराडी देवीची यंदाची यात्रा दिनांक २ मार्च ला पार पडणार आहे असे खात्रीपूर्वक समजल्यावर भाविकांची जत्रेला जायची तयारी सुरु झाली. पूर्वांपार चालत आलेल्या आंगणे वाडी च्या आंगणेच्या प्रथेनुसार देवीचा कौल घेऊनच यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आणि या यात्रेला येत असतात. भाविकांबरोबरच राज्यभरातील राजकीय नेतेमंडळींची तसेच कलावंत, उद्योगपति सर्व स्तरावरील भक्तगणांचीही मोठी गर्दी या यात्रेला दिसते जसे जमेल तसे भक्तगण येऊन देवीचे दर्शन घेतात. यंदाच्या वर्षी किमान लाखोंच्या संख्येत भाविक यात्रेला येतील असा अंदाज मंदीराच्या कार्यकारिणीकडून तसेच इतर माध्यमांच्या मार्फत वर्तवला जात आहे. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आणि तळमळ रेल्वे, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी देखील पाहावयास मिळते.

देवीच्या यात्रेची तारीख कळल्यापासून ठिकठिकाणहून आता अनेक चाकरमान्यांनी, भक्तगण अर्थात भाविकांनी गावाला जाण्यासाठीचे प्रयत्न सुरु केलेत काहींनी ग्रुप बुकिंग, रेल्वेचे आरक्षण, एसटीचे आरक्षण, खाजगी प्रवास वाहतूक याची ओळखीने हस्ते परहस्ते जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असणार यात शंका नाही. नोकरीच्या ठिकाणी सुट्ट्यांची तयारी म्हणू नका, धंदा व्यवसाय व्यवस्थापन हे सारे सोपस्कार करण्यापासून ते अगदी माघारी येण्यासाठीची व्यवस्था याकरिता अनेकांचीच धडपड देखील सुरु झालीय. देवीची हि यात्रा दरवर्षी आतुरतेने पाहण्याचा मोह भक्तगणांना आपसूक देवीकडे घेऊन येतो हे विशेष आहे.

नवसाला पावणारी माउली आई भराडी देवी हि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी लाभलेला मालवण तालुक्यातील प्रसिद्ध मसुरे गाव आहे. या गावातील आंगणेवाडी नावाची जी वाडी आहे त्या वाडीत ‘आई भराडी देवी’ विराजमान आहे. येथील भरडावर देवी प्रकट झाली आणि म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे तसे पाहता निव्व्ळ माळरान. या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा जवळ जवळ माळरानच आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं असे सांगितले जाते.

मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती जगविख्यात असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. तमाम भाविकांच्या अलोट गर्दी आणि देवीवरील नितांत श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. देवीकडे गाऱ्हाणं अथवा साकडं घालून आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात. दर वर्षी इच्छापूर्ती नंतर भक्ती भावाने आपले नवस देखील भक्तगण फेडतात.

देवीच्या यात्रेला जाण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशनपासून डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. या कणकवली बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने एसटी बसेस असतात. इतर वाहन सेवा देखील उपलब्ध आहेत.
कोकणातील जणू प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेलं हे तीर्थक्षेत्र तसेच नवसाला पावणारी आई माउली भराडी देवी अशी ख्याती सर्वदूर अगदी देशविदेशात देखील पसरलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील अथवा सिंधुदुर्गातील या पवित्र पंढीरीची वारी एकदा तरी घडावी असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे.

आंगणेवाडी निवासिनी आई देवी भराडी माउलीच्या नावानं चांगभलं… सर्व भाविकांना, भक्तगण आणि विशेषतः पाहुण्यांना देखील हार्दिक शुभेच्छा!

Related posts

2 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Sunil

Very nice information given