सौ. पल्लवी निनाद राणे. यांना राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत उद्योगिनी गौरव पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल, जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई तसेच, जानवली ग्रामस्थ महिला मंडळ, मुंबई आपले हार्दिक अभिनंदन करीत आहे.
अशा अनेक शुभेच्छा आज आपणास सोशल मीडियावर आपल्याला पहायला मिळाल्या. खरच अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा आपल्या अथक प्रयत्नाअंती आपल्याला मिळालेल्या यशाच्या आनंदात प्रत्येक जण सहभागी होतात आणि हीच वस्तुस्थिती आपल्याला प्रेरणा देते.
सौ. पल्लवी निनाद राणे यांना राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत उद्योगिनी गौरव पुरस्कार प्राप्त झाला या मागील त्यांचे प्रयत्न आणि यशाचे शिखर गाठण्याची जिद्द तसेच सोबत परिवारातील सहकार्य, मार्गदर्शन आणि एकजूट यामुळेच हे शक्य होऊ शकते. त्यांच्या या यशात सहभागी असलेल्यांचे देखील कौतुक करावेसे वाटते ज्यामुळे आज आपल्या जानवली गावाचे निश्चितच या सोहळ्यामध्ये कोरले गेले म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पुरुषांच्या बरोबरीने उद्योग, व्यवसायात स्त्रीयांचे देखील योगदान खरच वाखाणन्या सारखे आहे. या यशाच्या प्रेरणेने निश्चितच व्यवसायात पदार्पण केलेल्या तसेच पूर्वाम्पार व्यवसाय उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना देखील एक दिशा निश्चितच मिळेल. पुन्हा एकदा सौ. पल्लवी निनाद राणे. यांना राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत उद्योगिनी गौरव पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली करीत खूप खूप शुभेच्छा…