जीवेत शरद: शतम् शतम् जानवली गावातील नवोदित कवी सत्यवान सहदेव साटम | Jivet Sharad: Shatam Shatam Janavali village rising poet Satyawan Sahadeva Satam

navodit-kavi-satyawan-satam

जानवली गावातील नवोदित कवी म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण करण्यात यथायोग्य प्रयत्नशील असलेले सत्यवान सहदेव साटम यांचा आज वाढदिवस त्यानिमीत्ताने त्यांच्या या कविता अथवा काव्य लेखन या क्षेत्रात एक दिशा मिळाली ती सिंधुदुर्गातील नवोदित कवींचा “सिंधुदुर्गची नवी कविता” हा काव्यग्रंथ २३ जूनला मालवण येथे समाज संवाद साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. रणधीर शिंदे व संमेलनाचे प्रमुख पाहुणे समीक्षक प्रा. दत्ता घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत या संग्रहाचे प्रकाशन झालेले आहे.


‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा ग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून या ग्रंथाचे संपादन समीक्षक प्रा. संजीवनी पाटील आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी केले आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून कोकणबरोबरचे महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या कवींची काव्य गुणवत्ता वाचकांसमोर यावी या एकमेव हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची नवी कविता हा १६ कवींचा कवितांचा सहभाग असलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यात कवयित्री प्रियदर्शनी पारकर म्हाडगुत, डॉ. दर्शना कोलते, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, किशोर कदम, चेतन बोडकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, योगिता शेटकर, प्रा. संतोष जोईल, दिलीप चव्हाण, पल्लवी शिरगावकर, सुरेश बिले, रचना रेडकर, मंगल नाईक-जोशी,संदीप कदम आणि सत्यवान साटम, यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा समावेश आहे. कवी सत्यवान साटम आणि संदिप कदम दोन्ही जानवली गावचे सुपुत्र. यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला हा जानवली गावचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया या गावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

कवी सत्यवान साटम यांनी प्रथमच व्यासपीठावर सुंदर कवितेच सादरीकरण केले.कवी साटम आणि संदिप कदम यांनीही उत्तम कविता लेखन करून मराठी साहित्यात पुढे जावे अशी अपेक्षाही जानवली ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सोशल मीडिया वर देखील उत्तम प्रतिसाद मिळाल्याने कविता लेखनाचा उत्साह जाणवतो काही ग्रामस्थांकडून कविता संग्रहाच्या प्रति देखील मागवल्या मुळे आपल्या प्रयत्नांचे कौतुक झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देव लिंगेश्वर पावणाई त्यांच्या या प्रवासात त्यांना उत्तम यश देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

स्रोत : https://sindhudurgtodaynews.blogspot.com/2024/06/today_36.html

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments