आज, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा महाशपथविधी (शपथविधी) हा मुंबईच्या आझाद मैदानावर एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्यानंतर महायुती (भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) सरकारची स्थापना करत आहे त्याचा एक अलौकिक सोहळा जनतेला पहावयास मिळाला.
संध्याकाळी ५:३० वाजता शपथविधी सोहळा सुरू झाला राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्र गीत याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मागील कार्यकाळासाठी ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांचा हा मुख्यमंत्री म्हणून तिसरा कार्यकाळ सुरु होत असलेने ठिकठिकाणी मीडियावर देवेंद्र ३.० या आशयाचे व्हिज्युअल्स पहावयास मिळत होते. हा शपथविधी सोहळा माजी मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासारख्या नेत्यांच्या नवीन सरकारच्या रचनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी व्यापक तसेच स्मरणात राहील असा झाला आहे.
महाराष्ट्राच्या २१व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या शपथविधी नंतर माननीय एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शासन आणि लोककल्याणावर नव्याने लक्ष केंद्रित करताना महाराष्ट्रासमोरील आव्हानांना तोंड देण्याच्या युतीच्या संकल्पाचे प्रतीक असलेला हा कार्यक्रम आहे.
साधुसंत, महंत, सिनेसृष्टीतील कलावन्त, मोठमोठे उद्योगपती तसेच यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, सोहळ्याला उपस्थित होते. बॉलिवूड कलावंतांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यात प्रामुख्याने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, रणबीर कपूर, रणवीर सिंह यांची खास उपस्थिती होती. तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सपत्निक उपस्थित होता. उद्योगजगतातून रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, त्यांचे बंधू अनिल अंबानी शपथविधीला उपस्थित होते. महायुतीतील तमाम कारकर्त्यांच्या साक्षीने हा महाशपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आता उत्सुकता लागली आहे ती पुढील मंत्रिमंडळ विस्ताराची. नूतन सरकार तसेच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खूप खूप शुभेच्छा