सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कुणकेश्वर यात्रा महाराष्ट्रात पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात (फेब्रुवारी) महाशिवरात्री दिवशी साजरी केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राकाठी वसलेले कुणकेश्वर हे गाव त्याच्या किनाऱ्यावरील प्राचीन अर्थात पुरातन शिवमंदिरासाठी आणि त्याच्या लगतच्या समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाते. हा प्रदेश हापूस आंब्याच्या लागवडीसाठी आणि पुरवठ्यासाठी देखील जगभरात प्रसिद्ध आहे. असंख्य भक्त ही यात्रा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील कुणकेश्वर मंदिरात येऊन महादेवाचा आशीर्वाद घेऊन जातात. या वार्षिक जत्रा आणि उत्सवात शेकडो नव्हे तर लाखो भाविक येतात. या कालावधीत आयोजित केलेल्या जत्रेला आणि उत्सवातही लोकांची झुंबड उडते. या प्रसंगी मंदिराला दिवे, पाने, फुले इत्यादींनी सजवले जाते. याप्रसंगी अन्नदानही केले जाते. या कालावधीत विविध धार्मिक विधी केले जातात. भक्तगण श्रद्धेने देवाला अतिप्रिय बेल अर्पण करतात
सालाबाद प्रमाणे या वार्षिक जत्रा आणि उत्सवात शेकडो भाविक येतात. या कालावधीत आयोजित केलेल्या जत्रेला आणि उत्सवातही लोकांची झुंबड उडते. या प्रसंगी मंदिराला दिवे, पाने, फुले इत्यादींनी सजवले जाते. याप्रसंगी अन्नदानही केले जाते. या जत्रमध्ये पंचक्रोशीतील कत्येक गाव गावकरी आपल्या ग्राम दैवता सोबत पालखी सहित देखिल उपस्थित राहून देव कुणकेश्वर शंभो महादेवाचे आशीर्वाद घेतात आपल्या सहित आपले कुटुंब आणि गावाची राखण रखवाली घेतात.
या यात्रेचा सोहळा तसेच सर्व मूलभूत व्यवस्थांपासून देवाचे हे वार्षिक कुणकेश्वर ट्रस्ट मार्फत अगदी उत्तम रित्या हाताळले जाते. कोकणची दक्षिण काशी म्हणून देवगडमधील महादेव श्री कुणकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराच्या मंदिरात मोठ्या संख्येने देव दर्शनासाठी भाविक दाखल होतात. महाशिवरात्रीच्या या काळात कुणकेश्वर जत्रेत राज्यातील विविध भागातून व्यापारी सहभागी होत असतात. जत्रेत दुकाने, खेळणी, पाळणे, हॉटेल्स पाहायला मिळतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्ष कोरोना काळात देव कुणकेश्वरची जत्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने अथवा जवळ जवळ नसल्याने हि जत्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे असे सर्व माध्यमांचे व सिंधुदुर्गवासियांचे मत आहे.
यावेळी यात्रोत्सव तीन दिवस १८ फेब्रुवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणार असून शेवटच्या दिवशी सोमवती अमावस्येच्या पर्वणीवर देवतांच्या पवित्र तिर्थस्नानाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
जानवली गावातील असंख्य भाविक या यात्रेला आवर्जून सहभागी होताना दिसतात. या यात्रेत सहभागी होण्याकरिता सर्वात जवळचे विमानतळ चिपी आहे, जे ६२ किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे सोयीचे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन कणकवली आहे, जे ४६ किमी अंतरावर आहे. कणकवली एसटी स्टॅन्ड हि किंबहुना तेवढेच अंतरावर आहे . सर्वात जवळचे प्रमुख शहर देवगड आहे, जे ६ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.