जानवली ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करणे आणि ते शासनाकडे पाठविण्यासाठी नुकतेच युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.त्यातील काही महिलांचे अर्ज आज भरण्यात आले असून ते नियोजित वेळे पूर्वी भरण्याचा मार्ग आता सोपा झालेला दिसून येतो. महिलांना या योजनेचे अगदी समाधानकारक मार्गदर्शन आणि अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण विरहित व्यवस्था होण्यासाठी सरपंच अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष सुरू करण्यात आला आहे.
माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. तुमचे वय १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
- तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.
- ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
* एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेता येईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला *
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे
- (१) रेशनकार्ड
- (२) मतदार ओळखपत्र
- (३) जन्म प्रमाणपत्र
- (४) शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड *
- अर्जदाराचे हमीपत्र *
- बँक पासबुक *
- अर्जदाराचा फोटो *
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे
- (१) रेशनकार्ड
- (२) मतदार ओळखपत्र
- (३) जन्म प्रमाणपत्र
- (४) शाळा सोडल्याचा दाखला
अर्ज कुठे करावा
Online (ऑनलाइन)
ऑनलाइन अर्ज Narishakti Doot या ऍप वर करता येईल.
Offline (ऑफलाईन)
- ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करावा.
- शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वॉर्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.
जानवली ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गावातील लाभार्थी महीलांचे फॉर्म भरण्यात आले. यावेळी स्वतः सरपंच श्री. अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन राणे, दामू सावंत, प्रिती कदम, अनुष्का राणे, तसेच अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व जानवली गावातील महीला भगिनी देखील उपस्थित होत्या. तसेच CRP सौ. दिशा राणे व उन्नती राणे उपस्थीत होते.