धार शस्त्रास होती पण ताकद विचारात होती अर्थात श्री शिवरौद्रप्रताप या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग
स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ तर्फे आयोजित आजच्या श्री शिवरौद्रप्रताप या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग शिवभक्त तसेच तमाम नाट्य रसिकांना आज दामोदर हॉल परळ मध्ये एक विलक्षण थरार पहायला मिळाला आणि तो दुसरे तिसरे कुणी नसून चक्क स्वयंसिद्धा महिला मंडळ परळच्या जवळ जवळ ४५ रणरागिणी यांनी घडवून आणला.
तब्ब्ल ४ महिन्याच्या अथक परिश्रमानंतर आज या सर्व सहभागी महिलांचे, कलाकारांचे स्वप्न साकार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी केलेला हा मानाचा मुजरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
प्रत्येक क्षेत्रात स्रिया ह्या नेहमीच आघाडीवर असतात परंतु आज पुन्हा एकदा या महिलांनी हा नाट्यप्रयोग यशस्वी करून आपला ठसा उमटविला.
लेखक-दिगदर्शक श्री. रुपेश पवार यांच्या शब्दात सांगायचे झाले तर…
श्री शिवकाळात सर्व निष्ठावंतानी 18 तासांचे रणकंदन वाजवले…
चार महिन्यांची तयारी..
अनेक अडचणी आल्या…
अनेक संकटं आली…
काही गोष्टी जुळल्या…
काही बिघडल्या…
काही आप्तस्वकीय परके झाले…
पण काही निष्ठावंत लाभले..
काही गोष्टींचा मनःस्ताप झाला..
काही गोष्टी मनाजोगत्या घडल्या..
काही गोष्टींची काळजी लागली..
काही गोष्टी समाधानाच्या घडल्या..
काही वेळा आसवांचा गहिवर मनात भरला…
काही वेळा रागाचे किल्मिष मस्तकात उरले…
पण अंती सर्वांनी स्वकार्य ओळखून आपापल्या भुमीका जवाबदारी ने बजावल्या…
कुणी अडखळले पण चुकले नाही…
ईश्वराला स्मरुन रणपिठावर स्वतःचा दर्जा सिध्द केला…महतप्रयत्न केला
अण सरतेशेवटी रणतांडव विजयी झाले…
इतके आसमंत भेदून दशदिशांस डंका वाजला…
सर्व निष्ठावंतांनी अफजलास फाडुन श्री शिवरोद्रप्रताप यशस्वी केला….
३६० वर्षांपूर्वी ही घटना इतिहासात घडली आणि आज ३६० वर्षानंतर तीच घटना वर्तमानात घडणार…
त्या पराक्रमाची ती संधी तुम्हा सर्वांना चालून आलेली आहे….
मागे हटू नका
आपापली भूमिका चोख पार पाडा.
श्री शिवराय आहेत आपल्या साथीला
विजय आपलाच होणार….
दिगदर्शकांच्या या आत्मविशसाला सर्वानी योग्य तो प्रतिसाद देऊन आपापली भूमिका अगदी चोख बजावली.
विशेष नमूद करण्या सारखी बाब म्हणजे या सर्व महिला सभासद, पदाधिकारी, त्यांचे मित्र परिवार सर्वांचे सहकार्य होते काही लहान मुले-मुली, तरुण-तरुणी, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन होतेच. आपल्या जानवली गावठणवाडीचे प्रणव राजन साटम तसेच सौ. प्रणिता राजन साटम यांनी देखील यात सहभाग घेऊन खारीचा वाटा उचलला.
सहभाग :
१.छत्रपती शिवाजी महाराज – सौ नीलिमा खोत
२.अफाजलं खान – सौ दिया पराडकर
३.गोपीनाथ पंत – सौ श्रुती परब
४.कृष्णाजी भास्कर – सौ कीर्ती कुलकर्णी
५.मुसे खान – सौ पायल शेगडे
६.दीपाऊ बांदल – सुरभी शेगडे
७.सुभेदार तान्हाजी मालुसरे सौ. वनिता पवार
८. बाबाजी गुजर सौ. वनिता पवार
९. गावकरी महिला – संजना पवार
१० विसाजी – रुपेश पवार
११. फाजलखान – सोमेश बने
१२. बडी बेगम – सौ. शितल तळेकर
१३. बहिरोजी नाईक व गुर्जबदार – प्रणव साटम
१४. मराठा पाळेदार व अलीअदिलशाह – सोहम परब
१५. बाल शिवाजीराजे – श्रेयस दिसले
१६. बडा सयद – सौ ज्योती खुडे
१७. कृष्णाजी जेधे व गावकरी -समिक्षा खुडे
१८.गावकरी, दासी – सौ स्वाती पेडणेकर
१९.मंजिरी व ढमाले तात्या , संभाजी कावजी कोंढाळकर -सौ. संचिता जोईल
२0 . गावकरी, येसाजी कंक – जयमाला पवार
२१.बाबाजी घोरपडे व याकुत खा -सिद्धि बने
२२. जिजाबाई- सौ जानवी सावंत
२३. सेकोजी व कृष्णाजी बंकी गायकवाड- सौ स्नेहल पवार
२४ पंत.महादेव बुवा भट.मावळे – सौ. संगिता मोहळ.
२५ शामराज पंत रोंझेकर , संभाजीराव करवर – अस्मिता चाळके
२६ वासुदेव व सुरजी काटे – सौ रोहिणी वाईरकर
२७ अंबाजी मलकरे – सौ दिशा आगणे
२८ जीवा महाले व पिलाजी मोहिता – सौ प्रणिता साटम
२९ मोरोपंत व गावकरी- ऐश्वर्या भूर्के
३० गणोजी, मावळा व इब्राहम सिद्धी बरबर – अक्षय थवी
३१ कान्होजी जेधे – सौ. पुजा कदम.
३२ वंजारे सलतनत व सिद्धि हिलाल -सौ शितल बने
३३ रूस्तम व अंबर का – सौ रश्मी नाईक
३४ गावकरी – सौ अमिता पवार
३५ शिळीमकर – सौसुनिता खंडागळे
३६ मावळा – सौ दिशा हळदणकर
३७ मावळा – सविता मांजरेकर
३८ ट्रेकिंग ची मुलं – मायरा चव्हाण
३९ ट्रेकिंग ची मुलं – अगस्त्य हुले
४० ट्रेकिंग ग्रुप – सौ आदिती भुस्कुटे
४१ ट्रेकिंग ग्रुप – मिलिंद सुर्वे
नाट्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी कलाकार, वेशभूषा, केशभूषा, पार्श्वसंगीत, नेपथ्य , निर्मिती व्यवस्थापन, बॅकस्टेज, तसेच दिग्दर्शन सहीत संपूर्ण टीम ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा! आई तुळाभवानीच्या आशीर्वादाने आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपला आजचा प्रयोग निर्विघ्नपणे यशस्वी झाला तसेच याही पुढे आपणास यशश्री आणि विजयश्री मिळो हीचं ईश्वरचरणी तसेच देव लिंगेश्वर पावणाई कडे प्रार्थना.