प्रणव साटम हा जानवली गावठणवाडी येथील श्री. नामदेव साटम यांचा नातू मुंबई मध्ये वाणिज्य शाखेत पदवीधर असून कोणतेही मार्गदर्शन नसताना कसलाही पूर्वानुभव नसताना त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने स्वतःचे युट्युब चॅनेल बनविले आणि हि त्याची पहिलीच शॉर्ट फिल्म खुपच प्रसिद्ध झाली. शॉर्ट फिल्म – व्यायाम ट्रेनरचो व्यायाम शॉर्ट फिल्म – कोरोनाव्हायरस चा रामायण चॅनेल ला भेट द्या : https://www.youtube.com/@PranavSatam
Read More | पुढे वाचाBlog / ब्लॉग
Lake / तलाव
जानवली गावात मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर तलाव असून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात आढळून येते. या तलावाचा परिसर अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. तलावाचे क्षेत्र विशाल असून पर्यटनासाठी भुरळ पडणारे आहे. या तलावाच्या पाणी पुरवठ्यामुळे आजूबाजूच्या किंबहुना पंचक्रोशीत चांगल्या प्रमाणात मुबलक पाणी पूरवठा होऊ शकतो
Read More | पुढे वाचाRiver / नदी
जानवली गावात एक सुंदर नदी कणकवली शहराच्या वेशीवर असून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात आढळून येते. हि नदी पावसाळ्यात अगदी तुडुंब भरून वहात असते. या नदीचा परिसर अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. नदीचे पात्र विशाल असून पर्यटनासाठी भुरळ पडणारे आहे. या नदीच्या पाणी पुरवठ्यामुळे आजूबाजूच्या किंबहुना पंचक्रोशीत चांगल्या प्रमाणात मुबलक पाणी पूरवठा होऊ शकतो
Read More | पुढे वाचाLingeshwar Temple / लिंगेश्वर मंदिर
देव श्री लिंगेश्वर हे एक जागृत देवस्थान असून हे पुरातन प्राचीन मंदिर गावच्या गर्द वनराईत निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे
Read More | पुढे वाचाPro Kabaddi / प्रो कबड्डी
प्रणय राणे मुक्काम पोष्ट जानवली सकल वाडी येथील एक होतकरू खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने विवो प्रो कबड्डी सारख्या कबड्डी खेळामध्ये प्रवेश मिळविला सध्या तो यू मुंबा या टीम साठी खेळत असून दिवसागणिक त्याची प्रगती उत्तमरीत्या प्रगती पथावर आहे. प्रणय राणे याने या खेळात आपला जम बसविला असून अनेक मोठं मोठया नामांकित खेळाडूंसोबत त्याची टक्कर पाहताना जानवली गावाचे नाव दिमाखात डोलताना दिसल्याची अनुभूती येते. प्रणयचा हा प्रवास खडतर असला तरी त्याची जिद्द आणि चिकाटी नक्कीच त्याला तारून नेईलच. आजच्या या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तसेच स्वतःला टिकून ठेवण्यासाठी…
Read More | पुढे वाचाPincode / पिनकोड
पिनकोड म्हणजे काय? पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) हा भारतातील क्षेत्र/प्रदेशातील डिलिव्हरी पोस्ट ऑफिस ओळखण्यासाठी 6 अंकी कोड आहे. देशात 8 पिन क्षेत्रे आहेत. पहिला अंक प्रदेशांपैकी एक दर्शवतो. पहिले 2 अंक एकत्रितपणे उपक्षेत्र किंवा पोस्टल मंडळांपैकी एक सूचित करतात. पहिले 3 अंक एकत्रितपणे वर्गीकरण / महसूल जिल्हा दर्शवतात. शेवटचे ३ अंक डिलिव्हरी पोस्ट ऑफिसचा संदर्भ देतात. प्रदेश कोड असाइनमेंट १ उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर २ उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर प्रदेश राजस्थान आणि गुजरातसह ३ पश्चिम प्रदेश ४ पश्चिम प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य…
Read More | पुढे वाचाKabaddi / कबड्डी
गौरव राणे मुक्काम पोष्ट जानवली सकल वाडी येथील एक मेहनती खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने कबड्डी सारख्या खेळामध्ये प्रवेश मिळविला सध्या तो आतंरराष्ट्रीय टीम साठी खेळला असून दिवसागणिक त्याची प्रगती उत्तमरीत्या प्रगती पथावर आहे. गौरव राणे याने या खेळात आपला चांगलाच जम बसविला असून अनेक मोठं मोठया नामांकित खेळाडूंसोबत त्याचा खेळ पाहताना जानवली गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात डोलताना दिसल्याचे दिसून येते. गौरवचा हा प्रवास कष्टदायी असला तरी त्याची जिद्द आणि चिकाटी नक्कीच त्याला आयुष्यात अनेक संधी उपलब्ध करून देईल. आजच्या या स्पर्धात्मक युगात स्वतःला टिकवण्या साठी तसेच स्वतःला…
Read More | पुढे वाचाPhotography / छायाचित्रण
पुष्पम राणे जानवली गावठणवाडी येथील एक उत्तम छायाचित्रकार ज्याची अफलातून फोटोग्राफी आपणास सोशिअल मेडिया तसेच अनेक कार्यक्रमात पहायला मिळते. पुष्पम याला सुरुवाती पासूनच कॅमेऱ्याचे वेड अगदी मोबाईल जरी त्याने हातात घेतला तरी चालता चांगले क्षण तो त्यात टिपायचा.
Read More | पुढे वाचामुक्काम पोष्ट जानवली
जानवली गाव हे मुंबई गोवा महामार्गावर वसलेले असून १२ वाड्यांचे हे गाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. जानवली गाव हे तसे कनकवली तालुक्याचा भाग असून कनकवली शहरा लगतच आहे दोघांच्या मध्ये जानवली नदी आहे. मुबलक पाणी उपलब्ध असलेले शेती प्रधान तसेच पूर्वजांच्या रूढी परंपरेचा वारसा जपणारे असे हे गाव येथे येण्याची पर्यटकांना देखील भुरळ पडलीनाही तर नवलच. जानवली गाव तसे सर्व सुख सोयींनी समृद्ध असून विकासाच्या दृष्टीने देखील ग्रामस्थांची प्रयत्नांची पराकाष्टा चालूच असते. जानवली गाव हे देव लिंगेश्वर व देवी पावणाई यांच्या आशीर्वादाने तसेच यांच्या कृपादृष्टीने सर्व स्तरावर आपला ठसा उमटवीत…
Read More | पुढे वाचाजानवली देवाचे वार्षिक २०२२
जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक हे दर वर्षी देवदिवाळीच्या दरम्यान म्हणजेच देवदिवाळीच्या आदल्या दिवशीची दिव्याची जत्रा हि आजूबाजूचा पंचक्रोशीतच नव्हे तर मुंबई ते गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, किंबहुना भारतात हि बऱ्याच अंशी परिचित असून भाविकांची अलोट गर्दी येथे पाहावयास मिळते. जानवली गावात देवाच्या वार्षिकाला सुरुवात एकादशीला होते विविध स्थळांवर देवांचे ग्रामस्थांसहित भेट देऊन तेथील महाप्रसादाची व्यवस्था स्थानिकांमार्फत केली जाते व उपस्थित सर्व भाविकांना या महाप्रसादाचा लाभ घेता येतो.
Read More | पुढे वाचा