अंगारकी चतुर्थी

Angaraki Chaturthi / अंगारकी चतुर्थी

अंगारकी चतुर्थी

गणपती मंदिर स्थळ गणपतीची वाडी मुक्काम पोस्ट जानवली, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील हे जागृत देवस्थान असून संकष्टी चतुर्थीला आवर्जून भक्तगण येथे येतात. सायंकाळी आरती केल्यावर प्रसाद घेऊन गणरायाचा आशीर्वाद घेऊन आपल्या उत्कर्षाची व यशाची प्रार्थना करतात. आज अंगारकी चतुर्थीचा या वर्षीचा एकमेव योग्य असल्याने भक्तांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.

काही भक्तगण नित्यनेमाणे देवाचे खालील गणपती स्तोत्र पठण करीत असताना पहावयास मिळते:

गणपती स्तोत्र संस्कृत / Ganpati stotra in Sanskrit ( संकटनाशन गणपती स्तोत्र )

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डंच एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमंच षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रंच दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिद्धींच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

Ganpati stotra in marathi / गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

Calendar / दिनदर्शिका

Date

Jan 10 2023
Expired!

Time

9:00 pm - 9:00 pm

Leave a Comment