balasaheb-thackeray

Balasaheb Thackeray Jayanti 2023 / बाळासाहेब ठाकरे जयंती २०२३

बाळासाहेब ठाकरे जयंती २०२३: आज २३ जानेवारी २०२३ रोजी ९७ वी जयंती साजरी होत आहे. शिवसेनेचे संस्थापक- बाळासाहेबांना त्यांच्या समर्थकांमध्ये टायगर आणि हिंदूहृदयसम्राट म्हणूनही ओळखले जाते. बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ‘प्रबोधनकार’ हे म्हणून ओळखले जाणारे एक थोर व्यक्तिमत्व होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीतही त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित झाली.

पेशाने पत्रकार आणि व्यंगचित्रकार असलेले वडील केशव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना प्रेरणा मिळाली. महाराष्ट्राच्या वेगळ्या भाषिक राज्याच्या निर्मितीचा पुरस्कार करणाऱ्या ‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीचा ते अविभाज्य भाग होते. १९६० मध्ये, बाळासाहेबांनी आपल्या भावासोबत ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी १९६६ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना हा राजकीय पक्ष नसून छत्रपती शिवाजी महाराजांची सेना आहे, असे बाळासाहेब ठाकरे सतत म्हणायचे.

बाळासाहेब हे हिंदुत्वाचे खंदे समर्थक होते, त्यांनी सर्व हिंदूंना भाषिक अडथळे तोडून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील शिवाजी पार्कवरील वार्षिक भाषण हे सर्वश्रुत तसेच लोकप्रिय होते. त्यांच्या वर प्रेम करणारी जनता आवर्जून या दसऱ्याच्या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होत असत.

Date

Jan 23 2023
Expired!