Gajanan Maharaj Prakat Din

Gajanan Maharaj Prakat Din | श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तांची शेगावला अलोट गर्दी

१३ फेब्रुवारी म्हणजेच आज श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिवस. आज शेगाव श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तांच्या श्रद्धेने भक्तिरसात भरभरून वाहत असतं. आज फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही आलेल्या पालख्या शेगावात दाखल होतात.”श्री गजानन महाराज की जय” च्या जयघोषात अवघं शेगाव दुमदुमुन जातं. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात मोठा उत्सव असतो.

२३ फेब्रुवारी १८७८ साली शेगाव मध्ये वद्य सप्तमीला गजानन महाराजांचे पहिले दर्शन झाले. त्यानुसार हा दिवस गजानन महाराजांचा प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी माघ कृष्ण सप्तमी चा दिवस संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन म्हणून साजरा करण्याची रीत आहे. भाविकांच्या धारणेनुसार, गजानन महाराजांचा प्रकट दिन हा शुभ दिवसांपैकी एक आहे. प्रकटदिनी गजानन महाराजांच्या मंदिरा मधून पालखी काढली जाते. त्यांच्या पादूकांचेही पूजन केले जाते.

श्री गजानन महाराज यांचे जीवन आणि त्यांच्या जीनातील विविध पैलू, विविध लीला ‘श्री गजानन विजय ग्रंथ‘ मध्ये आपलयाला पाहायला मिळतात. हा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेला आहे.

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

Date

Feb 13 2023
Expired!

Leave a Comment