Ganesh Chaturthi | गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी, हा भारतातील सर्वात उत्साही आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. विशेषतः कोकणात, सिंधुदुर्ग, गोवा या सणाला एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. गणरायाची आपल्या या राजाची घरोघरी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रपरिवारासह सेवा करतात. हा शुभ हिंदू सण बुद्धी, समृद्धी आणि नवीन संकल्प, नूतन व्यवसाय याकरिता सुरुवातीची शुभकार्याची अग्र देवता गणेशाच्या जन्माचे प्रतीक आहे. २०२३ मध्ये, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर रोजी येते अर्थात मंगळवार असल्याने अंगारक योग देखील आहे, गणरायाचा हा उत्सव म्हणजे समस्त प्रजाजन आणि भक्तांसाठी आनंदोत्सव जणू, भव्य मिरवणुका आणि मनापासून प्रार्थना करण्यासाठी एकत्र येण्याची एक अलौकिक संधीच आहे. या दिवशी लोक, गणेश भक्त, भक्तगण मनोभावे स्तोत्र पठण करतात, पंचोपचार अथवा षोडशोपचार पूजाअर्चना करतात, आरत्या भजन करतात.
गणपतीची आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥