mahashivratri

Mahashivratri 2023 Date | महाशिवरात्री २०२३: यंदाची महाशिवरात्र कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, शिवपूजनाची पद्धत.

महाशिवरात्री 2023 कधी आहे: यावेळी महाशिवरात्री शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी केली जाईल. भगवान महादेव शिव शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस शिव भक्तां करिता तसेच जनमानसात देखील विशेष मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह याच दिवशी झाला होता. दर वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते.

हिंदू संस्कृती आणि परंपरा, रूढी आणि संत महंतांच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. भगवान शंकराची कृपा आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस विशेष मानला जातो.

महाशिवरात्रीची चतुर्दशी तारीख १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ०८:०२ वाजता सुरू होईल आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०४:१८ वाजता समाप्त होईल. निशिता काळात अर्थात रात्रीच्या समयी महाशिवरात्रीची पूजा केली जाते.

निशिता कालची वेळ – १८ फेब्रुवारी, रात्रौ ११:५२ ते १२:४२ पर्यंत
पहिल्या प्रहारच्या पूजेची वेळ – १८ फेब्रुवारी, संध्याकाळी ०६:४० ते ०९:४६ पर्यंत
दुसऱ्या प्रहारच्या पूजेची वेळ – रात्रौ ०९:४६ ते १२:५२ पर्यंत
तिसऱ्या प्रहारच्या उपासनेची वेळ – १९ फेब्रुवारी, रात्रौ १२:५२ ते ०३:५९ पर्यंत
चौथ्या प्रहारच्या उपासनेची वेळ – १९ फेब्रुवारी, पहाटे ०३:५९ ते ०७:०५ पर्यंत
उपवास सोडण्याची वेळ – १९ फेब्रुवारी २०२३, सकाळी ०६:१० ते दुपारी ०२:४० पर्यंत

महाशिवरात्री पूजा पद्धत (महाशिवरात्री २०२३ पुजा विधि)

महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मूर्तीला/पिंडीला पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर गंगाजल/शुद्ध जल म्हणजेच पाणी अर्पण करावे. त्या दिवशी रात्रभर दिवा लावावा. चंदनाचा तिलक लावावा किंवा कपाळी भस्म लावावे. बेलपत्र, भांग, धतुरा, उसाचा रस, बेलफळ, अक्षता, फळे, मिठाई, गोड पान, अत्तर आणि दक्षिणा अर्पण करा. शेवटी खीर किंवा गॉड नैवेध अर्पण करून प्रसाद वाटावा. ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करा. या दिवशी शिवपुराण वाचावे. महाशिवरात्रीच्या दिवशीही रात्रीची जागर सुद्धा केली जाते.

महाशिवरात्री हा सण जगभरातील हिंदू मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. भक्त दिवसभर उपवास करतात आणि भगवान शिवाला आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना आणि अर्पण करतात. देवतेची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. भक्त भगवान शिव मंदिरांना भेट देण्यासाठी आणि पूजा विधी करण्यासाठी देखील जातात. भारतातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरे वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिर, गुजरातमधील सोमनाथ मंदिर, जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ मंदिर आणि नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिर आहेत.

१२ जोतिर्लिंग दर्शन घेण्यासाठी देखील भाविक ठिकठीकाणी भक्तीभावाने प्रस्थान करतात. जानवली गावातील लिंगेश्वरच्या चरणी मस्तक ठेवून गावकरी मनोभावे महादेव लिंगेश्वराची मनोभावे सेवा करतात. जानवली पासून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र श्री कुणकेश्वर येथे देखील असंख्य भाविक देवाच्या यात्रेत सहभागी होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देव श्री कुणकेश्वराच्या यात्रेला पंचक्रोशीतील असंख्य गाव व ग्रामदैवत भेट देतात आणि महादेव भगवान श्री कुणकेश्वराच्या आशीर्वादाने राखण रखवाली घेण्याची प्रथा आहे.

Date

Feb 18 - 19 2023
Expired!

Time

6:40 pm - 2:40 pm

Leave a Comment