marathi-bhasha-din

Marathi Bhasha Gaurav Din | मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी अथवा जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा आहे. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला. आणि तेव्हा पासून आजचा २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

Date

Feb 27 2023
Expired!

Leave a Comment