Subhash Chandra Bose Jayanti 2023 / सुभाषचंद्र बोस जयंती २०२३
सुभाषचंद्र बोस जयंती २०२३: सुभाषचंद्र बोस यांना ‘नेताजी’ आणि ‘देश नायक’ ही पदवी कशी मिळाली, जाणून घ्या.
सुभाषचंद्र बोस जयंती किंवा नेताजी जयंती ही दरवर्षी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती स्मरणार्थ भारतात राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून साजरी केली जाते. हा दिवस भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्य आणि प्रदेशात, विशेषतः ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो.
सुभाषचंद्र बोस हे भारतीय इतिहासातील एक महान नायक आहेत, आज ते प्रत्यके भारतीयांच्या हृदयात आहेत त्यामुळे त्यांना तशी कोणत्याही ओळखीची गरज नाही. आज दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी नेताजींची १२६ वी जयंती आहे. जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी ‘आझाद हिंद सेना’ स्थापन केली होती. भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिकांमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचाही समावेश होतो. ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’/‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ ही नेताजींची घोषणा आजही भारतीयांमध्ये देशभक्तीची लाट निर्माण करते.
भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी नेताजींनी अनेक चळवळी केल्या. ब्रिटिश राजवटीविरुद्धचे युद्ध अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. देशाचे शूर स्वातंत्र्यसेनानी नेताजी यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या पैलू आणि रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक, ओडिशा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी होते. सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासात तडफदार होते. इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी नागरी परीक्षा उत्तीर्ण केली.
पण १९२१ मध्ये जेव्हा त्यांनी इंग्रजांनी भारतात केलेल्या शोषणाची बातमी वाचली, त्याचवेळी त्यांनी भारताला स्वतंत्र करण्याचे व्रत घेतले आणि इंग्लंडमधील प्रशासकीय सेवेची प्रतिष्ठित नोकरी सोडून आपल्या देशात परतले आणि स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. . ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’/‘तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा’ ही त्यांची घोषणा होती आणि ती त्यांच्या योगदानाने अजरामर झाली.
जर्मन हुकूमशहा हिटलरने सुभाषचंद्र बोस यांना पहिल्यांदा ‘नेताजी‘ म्हणून संबोधले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. नेताजीं सोबतच सुषभचंद्र बोस यांना देश नायक देखील म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांना रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून देश नायक ही पदवी मिळाली असे हि म्हणतात.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल काही निवडक महतवाची माहिती :
- नेताजी सुभाषचंद्र बोस नागरी परीक्षेत चौथा क्रमांक मिळवून प्रशासकीय सेवेत प्रतिष्ठेची नोकरी करत होते.
पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपली आरामदायी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि भारतात परतले. - जालियनवाला बाग हत्याकांडाचे हृदयद्रावक दृश्य पाहून सुभाषचंद्र बोस अत्यंत व्यथित झाले होते, त्यानंतरच ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.
- १९४३ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिनमध्ये आझाद हिंद रेडिओ आणि फ्री इंडिया सेंट्रलची स्थापना केली.
- १९४३ मध्येच आझाद हिंद बँकेने १० रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंतची नाणी जारी केली. एक लाख रुपयांच्या नोटेत नेताजी सुभाषचंद्रांचे चित्र छापण्यात आले होते.
- सुभाषचंद्र बोस यांना १९२१ ते १९४१ या काळात देशातील वेगवेगळ्या तुरुंगात ११ वेळा तुरुंगवास भोगावा लागला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस दोनदा निवडून आले.