क्रिकेट हा एक अतुलनीय खेळ आहे ज्याला भारतातील मान्यवर खेळाडू मा. सुनील गावस्कर, मा. कपिल देव, मा. दिलीप वेंगसरकर ते मास्टर ब्लास्टर मा. सचिन तेंडुलकर अशा कितीतरी दिग्गजांनी ह्या खेळाच्या यशोगाथे मध्ये भारताला उच्चतम शिखरावर नेऊन ठेवले आहे. दिवसागणिक नवीन युवा पिढी यात आत्मविश्वासाने सहभागी होऊन एक करिअर म्हणून देखील या कडे पहात आहे. अतिशय लोकप्रिय जागतिक मान्यताप्राप्त खेळ म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र युवा पिढीचे आकर्षण बनले आहे.
जानवलीच्या नयनरम्य मध्यवर्ती निलम हॉटेल जवळच, सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य जानवली मुंबई गोवा महामार्गा लगतच्या ठिकाणी, क्रिकेटचा जल्लोष समुदायाला वेड लावतो कारण आपण प्रिचितच असाल भाजप पुरस्कृत जानवली प्रीमियर लीग दिवस रात्र (day & Night) क्रिकेट स्पर्धा जानवली, ता.कणकवली दिनांक २२, २३, २४, २५ फेब्रुवारी २०२४ अर्थात आजपासून प्रारंभ झालेली हि मालिका सतत ४ दिवस आहे. हा कार्यक्रम केवळ खेळापुरता नाही तर हा सौहार्द, उत्कटता आणि स्थानिक क्रिकेट प्रतिभेच्या अनन्यसाधारण एकोप्याचा तरुण पिढीला प्रोत्साहन देण्याच्या भावनेचा उत्सव आहे.
जानवली येथील क्रिकेट स्पर्धा ही केवळ सामन्यांची मालिका नाही. अशा स्पर्धात्मक खेळातून एकात्मतेचा आणि संघटनात्मक भाग आहे जो संपूर्ण समाजाला या निमित्ताने एकत्र आणतो. क्रिकेटच्या खेळाच्या या सहभागा मुळे स्थानिक तसेच पंचक्रोशीतील विविध उत्तम खेळाडू, त्यांच्या कौशल्यांचा आणि रणनीतींचा सन्मान करून मैदानावरील गौरवासाठी स्पर्धा सुरू केल्याने उत्साह निर्माण होतो.