कोकणातील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेच्या निकालात केली फत्तेशिकस्त…
आजच दिनांक २ जून २०२३ रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकाला नुसार कोकण अव्वल म्हणजेच ९८.११% येवढ्या प्रचंड प्रमाणात घवघवीत यश मिळवून आजच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५० वा राज्याभिषेक सोहळ्या दिवशीच महाराष्ट्राच्या यशोगाथेमध्ये आपली यशश्री नोंदवली आहे.
अर्थात या सर्व विद्यार्थ्यांची मनापासूनची मेहनत, योग्य असे नियोजन, प्रामाणिक प्रयत्न त्याचप्रमाणे त्यांच्या आई वडिलांची तळमळ आणि समस्त गुरुजनांचे सखोल मार्गदर्शन या मुळेच हे सर्व शक्य होते.
आपल्या जानवली गावातील सर्व यशस्वी विध्यर्थ्यांचे मनःपूर्वक आभार तसेच खूप खूप कौतुक कारण कोरोना सारख्या महामारी मध्ये सर्वच शैक्षणिक, आर्थिक व जवळ जवळ सर्वच क्षेत्रात घडी विस्कटलेली असताना पुन्हा एकदा नव्या जोमाने आपण उभे राहण्याचे प्रयत्न करत असताना आपल्या प्रयत्नांना यश मिळाले त्याचा सर्व स्तरावर सर्व माध्यमातून गुणगान पहायला मिळतेय हि प्रत्येक विध्यर्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी देखील अभिमानाची बाब असते.
कुमारी सावरी यतिन राणे (गावठणवाडी) हिने दहावी परीक्षेत ९२% मार्क मिळविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, वैभवी संदिप सांवत साठमवाडी ९२% मार्क मिळविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन, कु. भुषण उमेश राणे ( घरटणवाडी) ७८.८० %, भंडारवाडी ,मयूर एकनाथ मिठबावकर रा,मुंबई ७२.४०%ने पास झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन, कु. वेदांत पाडुरंग राणे, कु. चंदना रविंद्र राणे यांचे देखील खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी यांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा. त्यांना पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा! तसेच या वर्षासाठी तयारी करीत असणाऱ्या सर्वांना देखील खूप खूप शुभेच्छा!