महाराष्ट्र SSC/दहावी परीक्षेच्या तारखा २०२४ जाहीर झाल्या आणि हा हा म्हणता दहावीच्या परीक्षा सुरु देखील झाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र SSC/दहावीचे वेळापत्रक २०२४ साठी सुधारित केले. MSBSHSE इयत्ता 10वीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात येत आहेत. आणि कागदाचे स्वरूप. विद्यार्थी महाराष्ट्र SSC/दहावी चे अपडेटेड वेळापत्रक अधिकृत वेबसाइट – mahahsscboard.in वर आपण पाहू शकतात. महाराष्ट्र SSC/दहावी तारीख अथवा वेळा पत्रक २०२४ मध्ये सर्व विषयांच्या परीक्षेच्या तारखा, दिवस आणि वेळेचा उल्लेख आहे. महाराष्ट्र एसएससी प्रवेशपत्र २०२४ हे नुकतेच म्हणजे ३१ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाले.
बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांच्या परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाला स्वतंत्रपणे कळवेल/कळविले जाते. विद्यार्थी महाराष्ट्र इयत्ता 10वी/दहावी परीक्षेच्या २०२४ च्या तपशीलवार तारखा महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत संकेत स्थळ अर्थात वेबसाईट वरच mahahsscboard.in पाहू शकतात किंबहुना पहावे. आणि त्यानुसार त्यांची तयारी सुरू करा, तयार रहा आपण वर्षभर केलेल्या अथक प्रयत्नांची हि शेवटची पायरी आहे.
यापूर्वी, बोर्डाने महाराष्ट्र बोर्ड एचएससी/बारावी परीक्षेच्या तारखा २०२४ ऑगस्ट २८, २०२३ रोजी जाहीर केल्या होत्या आणि परीक्षा १ ते २२ मार्च दरम्यान होणार होत्या.
जवळ जवळ १७ लाख विध्यार्थी या दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करून आपल्या शालेय जीवनाचा महत्वाचा टप्पा पार करतात. या तमाम विध्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा…