Maharashtra State Board 10th Exam | परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं तसेच शेवटी १० मिनिटांची वाढ; आजपासून १०वी बोर्डाची परीक्षा

ssc-exam-2023

Maharashtra State Board 10th Exam: परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं तसेच शेवटी १० मिनिटांची वाढ; आजपासून १०वी बोर्डाची परीक्षा

आजपासून अर्थात २ मार्च २०२३ महाराष्ट्र स्टेट बोर्डाची दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. कोरोनाच्या महामारीचे सावट बहुतांशी नष्ट झाल्याने (तीव्रता फार कमी असल्याने) शिक्षण तसेच परीक्षा तत्सम पद्धतीही ऑफलाईन झाले आहे त्यामुळे दहावीची हि परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होत आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाची दहावीची परीक्षा ही २ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे आणि २५ मार्च २०२३ पर्यंत संपणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट्स त्यांच्या शाळांकडून/कॉलेजेस मिळाले आहेत. कृपया विध्यार्थ्यानी हॉल तिकिटावरील संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे खात्री करून घेणं अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या आजपासून सुरु होणाऱ्या परीक्षेत यंदा कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये विशेष उपाय योजना राबवण्यात येणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी अथवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्रांवर विशेष भरारी पथकं आणि बैठी पथकं तैनात असणार आहेत. तसंच कोणत्याही विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी इतर आवश्यक प्रयत्न देखील करण्यात येणार आहेत.

दर वर्षी अर्थात सालाबाद प्रमाणे होणाऱ्या बोर्डाच्या प्रत्येक परीक्षे मध्ये कोकणातून जास्तीत जास्त विधार्थी उत्तीर्ण होत असतात हा इतिहास आहे किंबहुना मेरिट मधील टॉप १० यादी मध्ये कोकणचा वाटा नेहमीच मोठा असतो.

आजपासून सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आपल्या जानवली गावातील सर्व विध्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देव लिंगेश्वर पावणाई आपल्या प्रयत्नांना यश देवो हीच त्यांचे चरणी प्रार्थना. तसेच आपल्या पंचक्रोशीतील, सिंधुदुर्ग असो वा सम्पूर्ण महाराष्ट्रातील तमाम विध्यार्थ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. आई तुळजा भवानी आपल्या अथक प्रयत्नांना यश देवो हीच देवी कडे प्रार्थना.

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments