Maharashtra State Board 12th Exam: सेंटर्सवर भरारी पथकं तसेच शेवटी 10 मिनिटांची वाढ; आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा
आजपासून अर्थात २१ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. यंदा कोरोना सारख्या महामारीचे सावट नसल्याने (तीव्रता फार कमी असल्याने) शिक्षणही ऑफलाईन झाले आहे त्यामुळे परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत.
महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होणार आहे आणि २१ मार्च २०२३ पर्यंत संपणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट्स त्यांच्या शाळांकडून किंवा जुनिअर/सिनिअर कॉलेजेस कडून मिळाले आहेत. कृपया विध्यार्थ्यानी हॉल तिकिटावरील संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे चेक करून घेणं अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या आजपासून सुरु होणाऱ्या परीक्षेत यंदा कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये विशेष उपाय योजना राबवण्यात येणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी अथवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्रांवर विशेष भरारी पथकं आणि बैठी पथकं असणार आहेत. तसंच कोणत्याही विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी इतर प्रयत्न देखील करण्यात येणार आहेत.
दर वर्षी अर्थात सालाबाद प्रमाणे होणाऱ्या बोर्डाच्या प्रत्येक परीक्षे मध्ये कोकणात जास्तीत जास्त विधार्थी उत्तीर्ण होत असतात किंबहुना मेरिट मधील टॉप १० यादी मध्ये कोकणचा वाटा नेहमीच मोठा असतो.
आजपासून सुरु होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आपल्या जानवली गावातील सर्व विध्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देव लिंगेश्वर पावणाई आपल्या प्रयत्नांना यश देवो हीच त्यांचे चरणी प्रार्थना. तसेच आपल्या पंचक्रोशीतील, सिंधुदुर्ग असो वा सम्पूर्ण महाराष्ट्रातील तमाम विध्यार्थ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. आई तुळजा भवानी आपल्या प्रयत्नांना यश देवो हीच देवी कडे प्रार्थना.