सालाबाद प्रमाणे यंदाही कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली…
आजच दिनांक २५ मे २०२३ रोजी जाहीर झालेल्या बारावी विविध शाखेतील निकाला नुसार कोकण अव्वल म्हणजेच ९६.०१% येवढ्या प्रचंड प्रमाणात यशाचा शिखर गाठून महाराष्ट्राच्या मुकुटावर मानाचा तुरा रोवला हे निश्चितच.
अर्थात या सर्व विद्यार्थ्यांची मनापासूनची मेहनत आई वडिलांची तळमळ आणि गुरुजनांचे सखोल मार्गदर्शन या मुळेच हे सर्व शक्य होते.
आपल्या जानवली गावातील सर्व यशस्वी विध्यर्थ्यांचे मनःपूर्वक आभार तसेच कौतुक आणि कु. कृपा विनायक राणे घरटन वाडी हिने कला शाखेत ९२.८०% मार्क मिळविले त्याबद्दल तिचे विशेष कौतुक करावेसे वाटते जेणे करून पुढील वर्षाच्या परीक्षेला तयारी करत असलेल्या विध्यार्थ्यांसाठी तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक जण आपले परीने १०१% प्रयत्न नक्कीच करतील.
जाणवली शिक्षक कॉलनी येथील कु. यज्ञेश स्वप्नील पोकळे याने अपंगावर मात करत बारावीत मिळवले ९३.३३ टक्के गुण. खरच या मुलांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे त्यांना पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा! तसेच या वर्षासाठी तयारी करीत असणाऱ्या सर्वांना देखील खूप खूप शुभेच्छा!
Related posts
Subscribe
0 Comments
Oldest