सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, संमेलनाचे अध्यक्ष अभिनेते प्रमोद पवार, मास्तरांची सावली आत्मचरित्राच्या शब्दांकनकार लेखिका नेहा सावंत आणि दोन्ही आयोजक स्वामिराज प्रकाशनचे श्री रजनिश राणे आणि प्रभा प्रकाशनचे श्री अजय कांडर
संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुर्वे मास्तरांच्या रेखा चित्राचं अनावरण करताना सांस्कृतिक मंत्री
संमेलनातील सगळ्यात रंगलेल्या परिसंवादातील एक क्षण
संमेलनाच्या सभागृहत सांस्कृतिक मंत्री शेलार उपस्थित राहिल्यानंतरचा त्यांच्या सोबतचा एक क्षण
कवी संमेलनाच्या पहिल्या सत्रातला एक क्षण
कवी संमेलनाच्या दुसऱ्या सत्रातील एक क्षण
संमेलनात शाहीर म्हात्रे यांनी अप्रतिम सुर्वे मास्तरांच्या कविता सादर केल्या
सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर मध्ये कवी अजय कांडर सर आणि रजनीश राणे सर यांनी आयोजित केले.यावेळ संमेलनाचे समारोप पाहुणे राज्याचे उद्योग आणि भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासोबत संमेलनाचे अध्यक्ष अभिनेते प्रमोद पवार सर, अजय कांडर सर, रजनीश राणे सर, रजनी रजनीश राणे , कवी अशोक बागवे, कवयित्री वृषाली विनयक, श्री भाऊ कोरगावकर आणि सौ पवार ताई!
सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन, या कार्यक्रमात झालेल्या काव्य संमेलनात जानवली येथील कवि सत्यवान साटम यांनी कविता सादर केली.
निवडक अभिप्राय
सुर्वे मास्तरांचं साहित्य संमेलन अनेक अर्थांनी वेगळं ठरलं आहे. पोटतिडकीने लिहीणाऱ्या कवींना हे संमेलन प्रेरणा देत राहिल ह्यात शंका नाही. काळ बदलला राहतो आपण त्याला कसे सामोरं जातो ते महत्वाचं. सुर्वेमास्तरांनी त्यांच्या भोवतालचं जग.. दुःख.. जगणं.. आणि माणसं त्यांच्या कवितेतून मांडली त्याला तोड नाही. गिरणगाव उध्वस्त झाला हजारो संसार इतिहास जमा झाले.. गिरण्या जमिनदोस्त झाल्या त्यावर मॉल उगवले.. रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जातोय हा सगळा बदल फक्त साहित्यिकच टिपू शकतो.. तो साहित्यिक टिकला पाहिजे.. मग तो मराठी असो की अमराठी. तो टिकण्यासाठी अशी एकदिवसीय संमेलने आणि जागर महत्वाचा.. अजून शंभर वर्षांनी आजचे मॉल आणि टॉवर्स मोडकळीला आलेले असतील तेव्हा साहित्यिक काय दखल घेतील हा प्रश्न मला सतावतो..
मराठी आठव दिवसाच्या पुढील अनेक वर्धापन दिवसांसाठी शुभेच्छा.
द विनय नारायण
माहिम मुंबई