Marathi Athava Divas A Supernatural Activity | मराठी आठव दिवस एक अलौकिक उपक्रम

satyawan-satam-marathi-aathav-divas

मराठी आठव दिवस या उपक्रमाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी दामोदर हॉल परळ येथे या कार्यक्रमासाठी मा. रजनीश राणे जानवली घरटन वाडी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. सत्यवान सहदेव साटम जानवली गावठण वाडी, जानवली ग्रामस्थ हित वर्धक मंडळ तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आणि या निमित्ताने समस्त जानवलीकरांनी एकत्र येण्यासाठी चक्क निव्वळ १ रुपयात जानवली ग्रामस्थ हित वर्धक मंडळ आयोजित “संगीत संत तुकाराम” या संगीत नाटकाचे आयोजन देखील केले.
मराठी आठव दिवसच्या या अभिनव उपक्रम आणि अविस्मरणीय अशा कार्यक्रमास बहुतांश जानवली करांनी आपल्या नातेवाईकांसोबत उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मराठी आठव दिवस या उपक्रम आणि त्यात सहभागी असलेल्या मान्यवरांचे तसेच जानवली ग्रामस्थ हित वर्धक मंडळाचे पदाधिकारी यांचे स्वागत करून तदनंतर संगीत नाटक संत तुकाराम हे नाटक पाहण्याचा आनंद रसिक प्रेक्षकांना मिळाला. मध्यंतर नंतर जानवली ग्रामस्थ हित वर्धक मंडळाने आयोजक, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक, मा. रजनीश राणे यांचे आभार मानले.
स्वामीराज प्रकाशन या आपल्या संस्थेमार्फत ते दर महिन्याच्या २७ तारखेला ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम साजरा करतात. तमाम मराठी भाषा प्रेमींनी या उपक्रमात सहभाग घेऊन मराठी भाषे बद्दल आपले प्रेम, आपुलकी तसेच जवळीक व्यक्त करण्यासाठी एक अनोखी मालिका राबवली जात आहे त्यात आपले योगदान देऊन मराठी भाषेचे अस्तित्व जपण्यासाठी सहकार्य करणे हि आपली एक नैतिक जबाबदारी आहे.
मराठी आठव दिवस या उपक्रमाचा सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक या नात्याने जानवली ग्रामस्थ हित वर्धक मंडळाने माझा रविवारी जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार…।
असाच माया लोभ आणि पाठिंबा आमच्या या उपक्रमाला सदैव लाभो हीच लिंगेश्वर पावणादेवीकडे हात जोडून प्रार्थना धन्यवाद.
सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक : श्री. सत्यवान सहदेव साटम जानवली, गावठण वाडी.

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments