Modern Shravan (Satyawan) son | आधुनिक श्रावण ( सत्यवान) बाळ

satyawan-family

आपल्या वृद्ध अंध माता पित्याना कावडीने तीर्थक्षेत्री नेणारा सत्ययुगातील श्रावण बाळ असले किंव्हा अखिल विश्वाचा देव श्री हरी विठ्ठल दारात उभा असून ही माता पित्या ची सेवा पूर्ण होई पर्यंत विठ्ठला ला विठेवर उभा करून ठेवणाऱ्या पुंडलिकाची कथा असेल भावी पिढीला “आई वडिलांच्या सेवेत च ईश्वराची सेवा आहे” हा संदेश देऊन राहिली आहे.

उदरी मुलाने जन्म घ्यावा म्हणून देवाला नवस करणारे, तीर्थयात्रा करणारे अनेक दाम्पत्य आपण पाहिली असतील,पोटाला चिमटा काढून मुलाने शिकून खुप खुप मोठे व्हावे म्हणून काबाडकष्ट करणारे आई वडील ही आपण पाहतो,आणि खरच मूल खूप खूप शिकतात , इतकी शिकतात इतकी शिकतात की आई वडिलांच्या अखेरच्या अंतिम दर्शनाला ही त्याना यायला वेळ मिळत नाही,काही जण तर सरळ वृद्धाश्रमात रवानगी करतात.

या गंभीर परिस्तिथी ला अपवाद असणारे सत्यवान साटम सारखे आधुनिक श्रावण बाळ, समाजाला भूषणावह आहेत !! ” चौदा वर्षाहून अधिक काळ बेड वर असणाऱ्या आई वडिलांची अविरत, न कंटाळता आनंदाने सेवा करणाऱ्या सत्यवान साटम आणि त्याच्या परिवाराला आमचा मानाचा मुजरा!!

नुकतेच सत्यवान चे वडील कै. सहदेव साटम यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले,तत्पूर्वी काही वर्षे अगोदर मातोश्री नी ही निरोप घेतला . जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक दिवस हे जग सोडून जायचे आहे,परन्तु मुलांन जवळून इतकी प्रदीर्घ सेवा करून घेणारे साटम दाम्पत्ये आणि आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून प्रदिर्घकाळ सेवा करणारे सत्यवान साटम आणि परिवार पाहिला कीआज ही श्रावण बाळ,भक्त पुंडलिक या कथा पुनः पुनः वाचाव्यात असे वाटते.

गिरणी कामगारांचा झालेला संप आणि त्या सम्पात उध्वस्त झालेले अनेक परिवार आपण पाहिलेत, मुंबई सोडून गड्या आपुला गाव बरा, असे म्हणत बऱ्याच जणांनी सहपरिवार गाव गाठला त्यातीलच एक कै. सहदेव साटम परिवार !

गरिबीत ही स्वाभिमान, माणुसकी जपणारा परिवार! कै. सहदेवराव भजनी बुवा होते, भजनातील त्याचं ज्ञान, राग, ताल स्वर आम्ही अनुभवले नाहीत, परन्तु त्यांच्या बोलण्यातील विनम्र ,मृदू स्वर आम्ही निश्चित अनुभवले “दोन चार वेळा त्यांना भेटण्याचा योग आला तर” अहो साहेब खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून ,आमचा सत्यवान तुमच्या बद्दल नेहमी सांगत असतो ,लक्ष ठेवा त्याच्या वर वगैरे…..
….सत्यवान भेटल्या वर पहिला शब्द “,बाबा काय म्हणतत , चालला … आज बाबा चो वाढदिवस हा .. वेळ असलो तर येवा — सत्यवान म्हणाला
दिनेश सर व आम्ही सहकुटूंब शाल ,पुष्पगुच्छ घेऊन बाबांची भेट घेतली ” अंगावर पांगरलेली शाल,.. हातातील पुष्पगुच्छ .. बाबांच्या डोळ्यातील चमकणारे आनंदाश्रू .. आमचे दोन्ही हात हातात घेऊन .. ईश्वर तुमचे सदैव कल्याण करो .. हा बाबांनी दिलेला आशीर्वाद .. आज ही तो सुवर्णक्षण आठवतोय ..

सर्व विधी बेड वर करणारा माणूस आपल्या जीवाला कंटाळ लेला असतो, डिप्रेशनमध्ये गेलेला असतो परन्तु साटम बुवांचा हसरा चेहरा,व त्याचा आत्मविश्वास, आजवर भजन सेवेतून केलेले नामसमरण, घरच्या नी,जवळच्या नी केलेली सेवा हे त्यांच्या ९२ वर्षे जीवनाचे रहस्य होते असे म्हणावे लागेल.

कितीही जवळचा असला तरी शेवटचा प्रवास हा, हा अनेकदा “मुक्काम पोस्ट पडी ऑन द बारदान” असा असतो परन्तु गेल्या वर्षी सहदेव रावांना साटम कुटुंबीयांनी त्यांना गोवा मुंबई प्रवास विमानाने घडून त्यांची हवाई प्रवासाची ईच्छा ही पूर्ण केली.

“वैयक्तिक जीवनामध्ये आपण काय मिळविले काय गमावले, आर्थिक दृष्ट्या किती स्थिर स्थावर आहोत याचा आलेख सत्यवान कदाचित आज उतरता ही असेल परन्तु माझ्या तुटपुंज्याअध्यात्मिक अभ्यासाने एवढेच सांगू इच्छितो की विघनहर्त्या गणपती बाप्पा ने माता पित्या ना प्रदक्षणा घालून पृथ्वी प्रदक्षणा चे पुण्य मिळते हे अखिल विश्वाला दाखवून दिले आहे.

आपण व आपल्या परिवारा ने आई वडिलांची केलेली सेवा तुम्हा सर्वाना सुख ,शांती ,वैभव, ऐश्वर्य सर्वकाही मिळवून देईल यात तिळमात्र शंका नाही.

“पाच पाकळ्यांच फुल खूप दुर्मिळ असत आपल्या ला पहाताच फार आनंद होतो,त्यातील एक जरी पाकळी कोमेजली तरी सम्पूर्ण फुलांचे सौंदर्य निघून जाते. “राजन, सत्यवान, सुनीता, शारदा, जागृती” हे पंच पाकळ्या चे कमळ सदैव सदाबहार राहो, आई वडिलांच्या पश्चात तुम्ही सर्व एक विचाराने ,एक दिलाने राहणे हीच त्याना खरी श्रद्धांजली आहे.

आम्ही सर्व मित्र मंडळी आपल्या सुखदुःखात सदैव सहभागी आहोत…

धन्यवाद!

—– संदिप परब (आंब्रड), मित्रपरिवार…

12-13-divas

Related posts

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments