Narayan Rane is an extraordinary personality | नारायण राणे एक अलौकिक व्यक्तिमत्व

narayan-rane

जानवली गावातील गावठण वाडीतील माननीय कै. भिमराव राणे यांचे सुपुत्र आज दिनांक ४ मे २०२३ रोजी त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांच्या बद्दल दोन शब्द व्यक्त करण्याची संधी मिळाली. सन्माननीय नारायण राणे यांच्या बद्दल बोलणे एका लेखात अगदीच अशक्य कारण त्यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या सोबत बरेच महिने सहवास लाभल्यावर त्यांचा प्रत्येक क्षेत्रातील अभ्यास प्रचंड प्रमाणात अगदी एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान आणि त्याबद्दल त्याविषयावर त्यांची असलेली पकड खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम अभियांत्रिकीमधील प्रमाणित पदवीधर आणि रँकधारक, त्यांनी १९८० च्या दशकात डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण करून त्यांनी आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला. एका दशकापेक्षा कमी कालावधीनंतर, त्यांनी १९८६ मध्ये ‘साकुरा‘ या ब्रँड नावाने RFIEMI फिल्टर उत्पादनात पाऊल टाकले. २००० पर्यंत, त्यांनी बांधकाम साहित्य, फर्निचर आणि पांढर्‍या वस्तूंच्या आयात आणि निर्यातीचा व्यवसाय सुरू केला. आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यानंतर, आणि त्यांना आणखी व्यापक दृष्टिकोन ठेऊन, त्यांनी Ocean Transworld Logistics Pvt.चा पाया रचला.

श्री. नारायण राणे यांचे समाजकार्य देखील अतुलनीय आहे. प्रेमळ स्वभाव तसेच आपल्या माणसांबद्दल असलेली आपुलकी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आज हि तितकीच गावाबद्दल आपुलकी आणि जवळीक असल्याने टेक्नॉलॉजी क्षेत्रात शिखरावर असून देखील शेती फलोद्यान तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहून कार्यरत राहण्याची त्यांची तळमळ दिसून येते.

मुंबई ते गोवा सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या. तसेच अनेक गरजू व होतकरूना किंबहुना अति दुर्गम क्षेत्रातील आदिवासींना देखील मदतीचा हात देणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठीशी उभे राहणाऱ्या दानशूर मा. नारायण राणे याना वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव श्री लिंगेश्वर पावणाई कडे त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. जिवेत शरद शतम…

Related posts

2 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments