जानवली गाव हे शिक्षणाच्या बाबतीत अव्वल, मुळात सिंधुदुर्ग जिल्हा हा नेहमीच शिक्षण क्षेत्रात पुढेच असल्याने दर वर्षी जास्तीत जास्त मुलं मेरिट मध्ये येऊन कोकणचा मान उंचावत असतात.
जानवली गावात देखील मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी दर वर्षी जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळातर्फे अनेक थोरामोठयांच्या सहकार्याने बक्षिसे दिली जातात व मुलांचे मनोधेर्य वाढविले जाते.
जानवली गावात अनेक शाळा व विद्यालये आहेत जानवली शाळा नंबर १ हि सर्वात जुनी व मध्यवर्ती शाळा असून मुबंई गोवा महामार्गावर आहे. या शाळेत शिकलेले कित्येक विध्यार्थी आज ठिकठिकाणी आपल्या स्वकर्तृत्वावर मोठे झाले आहेत त्यांनी आपल्यासोबत आपल्या शाळेचे नाव देखील उंचावले आहे.
सखलवाडी येथील प्राथमिक शाळा देखील सध्या उत्तम प्रगतीवर असून येथील विद्यार्थ्यांची प्रगती सुद्धा वाखाणण्यासारखी आहे.
वाकाड़वाडी येथील प्राथमिक शाळा देखील सध्या उत्तम प्रगतीवर असून येथील विद्यार्थी सुद्धा प्रगती पथावर आहेत.
शिवाजी मेमोरियल ट्रस्टचे एस एम हायस्कुल ची एक शाखा जाणवली गावात देखील कार्यरत असून येथील विध्यर्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी त्याचा खूपच उपयोग होतो.