Janavali Tatachi Jatra 2023 | जानवली गावची “ताटाची जत्रा” २०२३

janavali-tatachi-jatra-2023

महाराष्ट्रातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेले एक १२ वाड्यांचे सुंदर गाव जे कोकणातील केंद्रस्थानी असलेल्या कणकवली तालुक्यात नव्हे तर अगदी कणकवली सीमेलगत नजीकचेच गाव म्हणजे जानवली पंचक्रोशीतच नाही तर अगदी मुंबई-गोवा प्रसिद्ध असलेली ताटाची जत्रा, दिव्याची जत्रा अथवा कणकवली स्वयंभू मंदिराच्या त्रिपुरारी पौर्णिमेची टिपराची जत्रेनंन्तर येणारी पहिलीच जत्रा अर्थात जानवली गावची “ताटाची जत्रा” आज दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी असून भाविकांची अलोट गर्दी आज पहावयास मिळते.

जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक हे दर वर्षी देवदिवाळीच्या दरम्यान सुरु होते साधारण कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला देव स्थळांवर जायला सुरुवात होते. एकादशीला सखल वाडी येथील स्थळा पासून सुरुवात होते स्थळावर उपस्थित भाविकांना महाप्रसाद असतो पूजाअर्चा, महाप्रसाद झाल्यानंतर देव स्थळावरून देवळात येण्यासाठी प्रस्थान करतात अगदी वाजतगाजत, भजन, लोकनृत्य अशा जल्लोषात देवांचा हा भाविकांसहित जनसमुदाय सदर वाडीतील प्रत्येक घरांच्या तळी घेऊन जल्लोषात आणि उत्सहात देवळात येतात.

devi-pavnai
devi-pavnadevi

अशा प्रकारे भानमळा, ब्राम्हणस्थान, दळवीवाडी, मुरकरवाडी, वाकाडवाडी, डोंगरवाडी, वायंगडेवाडी असे विविध ठिकाणी देवांची भेट, महाप्रसाद, तळी आणि भजन कीर्तन करीत देवळात येण्याचा उत्सव अंदाजे पाच दिवस सतत चालू असतो. अमावास्याच्या रात्री म्हणजेच देवदिवाळीच्या आदल्या दिवशीची दिव्याची जत्रा म्हणजेच ताटाची जत्रा या दिवशी अगदी मुंबई गोवा पासून समस्त चाकरमान्यांपासून, माहेरवाशिनी आपल्या सहपरिवार मित्रमंडळी सहित या जत्रेला आवर्जून उपस्थित राहून देव लिंगेश्वर देवी आदिशक्ती पावणाईचा आशीर्वाद घेतात रात्रभर रांगेत उभे राहून ताटाच्या दर्शनासहित स्वतःच्या काही समस्या असल्यास देवीकडे विनंती करतात.

devi-pavnai
devi-pavnadevi

अगदी आबाल वृद्धांपासून भाविकांची अलोट गर्दी येथे पाहावयास मिळते. रात्रभर दिवसाची रोषणाई. विविध खेळ, खेळणी तसेच स्थानिक होंतेलांची चहा भजी, प्रत्येकाला आवर्जून आवडणारे मालवणी खाजे, खडखडे लाडू, शेंगदाणा लाडू असे विविध गोड पदार्थ भाविक आनंदाने घेतात किंबहुना आपल्या पाहुण्यांना देखील देतात.

जानवली गावात देवाच्या वार्षिकाला मनोरंजन तसेच पूर्वाम्पार प्रथे प्रमाणे एक दशावतारी नाटक देखील पहावयास मिळते तसेच जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०२२-२०२३ असे विविध मुलांना, तरुण तरुणींना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देणारे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.

दुसऱ्या दिवशी देव दिवाळी या दिवशी देवीच्या देवळात ओट्या भरल्या जातात. देव लिंगेश्वराचे दर्शन घेऊन भाविक आपले मनोगत पूर्ण झालेले नवस देखील फेडतात. अशा प्रकारे एक अविस्मरणीय उत्साहवर्धक मंगलमय पवित्र असा उत्सव सोहळा त्याची अनुभूती आवर्जून प्रत्येकाने घेऊन पुढील पिढीकडे देखील यासारख्या उत्सव सोहळ्याचे महत्व समजून ते देखील आवडीने वेळात वेळ काढून उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील.

Related posts

4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments