आज ४ जानेवारी २०२४ आजचा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार असून असंख्य देवी भक्त हे व्रत करीत असतात परंतु यंदा ११ जानेवारीला गुरुवारी अमावस्या असल्याने आजच संध्याकाळी उद्यापन करावे का असा संभ्रम विशेषतः महिला वर्गात निर्माण झाला आहे. जाणून घेऊ आपण उद्यापण कसे व कधी करावे जेणे करून हे सर्वश्रुत महालक्ष्मीचे व्रत यथाविधी पूर्ण कसे होईल.
मार्गशीर्ष महिना हा तसा श्रवणाप्रमाणेच भक्ती भावाचा असतो. या महिन्यातील आचरण आहार यातही श्रावणाप्रमाणे भक्तगण भक्तिभावाने नित्यकर्म करतात. प्रत्येक वार आणि तिथीचे देखील आगळे-वेगळे महत्व आहे. २०२४ या नूतन वर्षातील आजचा गुरुवार ४ जानेवारी हा मार्गशीर्ष महिन्यातला तसा चौथा गुरुवार असून, पुढचा येणारा गुरुवार हा ११ जानेवारी रोजी आहे. यादिवशी मात्र सायंकाळी ५:२६ पर्यंत अमावस्या असल्यामुळे गुरुवारच्या व्रताचे उद्यापण ४ तारखेला करायचे की ११ तारखेला करायचं असा काहीसा गोंधळ होत असेल तर व्रताची सांगता कधी व कशी करावी हे अवश्य जाणून घ्या.
देवी महालक्ष्मीचे हे व्रत सुख-शांती, संपत्ती, संतती व समाधान, तसेच ऐश्वर्य मिळावे म्हणून आणि किंबहुना श्रीविष्णूपत्नी देवी श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी, आर्थिक सुबलता स्थिर व्हावी म्हणून करण्यात येते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करून साधारण चार गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा सर्वसाधारण सर्वश्रुत नियम आहे.
शेवटच्या गुरुवारी अर्थात ११ जानेवारीला अमावस्या असल्यामुळे ४ जानेवारीलाच गुरुवार व्रताचे उद्यापन करावे कि काय असा गोंधळ महिल्स वर्गात निर्माण झाला आहे, परंतू हे खरे पाहता कुठे नमूद अथवा शास्त्र मान्य नाही. विशेषतः अमावस्या ही अशुभ मानली जात नाही काही गैरसमज वगळले तर, अमावस्येलाच आपण लक्ष्मी पूजन करतो दीपावलीच्या उत्सव काळात त्यामुळे हा पर्वकाळ मानावा यात काही वावगं नाही. यामुळे आणखी एक गुरुवारचे व्रत करण्याचे फळ देखील भाविकांना मिळेल असे म्हटले तरी हरकत नाही. अमावस्येचा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा तसा कुठेहि आणि काहीही संबंध नाही. त्यामुळे मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता, संभ्रम न ठेवता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन ११ जानेवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारीच संपूर्ण पूजा विधीसह संपन्न करण्यास काहीच हरकत नाही कारण कोणत्याही व्रतवैकल्यात साधकांची अथवा भाविकांची भावना महत्वाची असते शेवटी देव हा भक्तीचा भुकेला असतो.
अध्यापनाच्या दिवशी देवी महालक्ष्मी व्रताची कथा आपल्या प्रथे प्रमाणे वाचावी. यथा विधी पंचोपचार वा षोडशोपचारे पूजाअर्चा करून संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा.
देवीला अतिप्रिय ते सुवासिनींचा आदरपूर्वक संध्याकाळी सुवासिनींना, कुमारींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रित करावे व त्यांना फळे, फुलं, गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक, एखादी भेटवस्तू [शक्य असल्यास] देऊन, त्यांची ओटी भरावी [सुवासिनींनी] व भक्तिभावाने सर्वाना नमस्कार करावा. आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे. या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं त्याला देखील विशेष महत्व आहे.
शुक्रवारी अर्थात दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, सर्व प्रातर्विधी व स्नानादी कार्य करून स्वच्छ वस्त्र घालावी आणि देवी लक्ष्मी मातेची मनोभावे यथाशक्ती पूजा करावी. देवी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी, ऐकावी. देवीची मनोभावे आरती करावी. आपल्या हातून व्रत आचरणात या कालावधीत काही कळत नकळत एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी देवी महालक्ष्मीकडे क्षमा प्रार्थना मागावी. यानंतर कळश हलवावा व त्याचे यथाविधी योग्य ठिकाणी विसर्जन करावे.
देवीच्या या पवित्र व्रताचे आचरण आणि सन्मान करणार्यांना देवी आवर्जून कृपा करेल तिला मनःपूर्वक दंडवत…