Temples / मंदिरे

devi-pavnai-temple

जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…

Read More | पुढे वाचा

Lingeshwar Temple / लिंगेश्वर मंदिर

lingeshwar-mandir

देव श्री लिंगेश्वर हे एक जागृत देवस्थान असून हे पुरातन प्राचीन मंदिर गावच्या गर्द वनराईत निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे

Read More | पुढे वाचा

जानवली देवाचे वार्षिक २०२२

Venue Vaingwadewadi 2022

जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक हे दर वर्षी देवदिवाळीच्या दरम्यान म्हणजेच देवदिवाळीच्या आदल्या दिवशीची दिव्याची जत्रा हि आजूबाजूचा पंचक्रोशीतच नव्हे तर मुंबई ते गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, किंबहुना भारतात हि बऱ्याच अंशी परिचित असून भाविकांची अलोट गर्दी येथे पाहावयास मिळते. जानवली गावात देवाच्या वार्षिकाला सुरुवात एकादशीला होते विविध स्थळांवर देवांचे ग्रामस्थांसहित भेट देऊन तेथील महाप्रसादाची व्यवस्था स्थानिकांमार्फत केली जाते व उपस्थित सर्व भाविकांना या महाप्रसादाचा लाभ घेता येतो.

Read More | पुढे वाचा