परमहंस भालचंद्र महाराज १२० वा जन्मोत्सव सोहळा
२८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४
परमहंस सच्चीदानंद सद्गुरू भालचंद्र महाराज ही एक देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण करणारे भालचंद्र बाबा जे अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते ते भक्तांचे तारणहार झाले. बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधीस्थानाच्या दर्शनाने असंख्य भाविकांना, भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर सातासमुद्रापार देखील बाबांचे भक्त आपणास कृपाछत्र लाभावे याकरिता परमहंस भालचंद्र बाबांच्या तपश्चर्यास्थान व समधीस्थानाच्या दर्शनाकरिता आश्रमात आवर्जून येत असतात.
२८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान बाबांचा जन्मसोहळा असलयाने अनेक कार्यक्रम सोशल मीडियावर देखील प्रसारित होत आहेत त्याच औचित्य साधून बाबांना दोन हात आणि तिसरे मस्तक जोडून साष्टांग दंडवत. भाविकांनी अर्थात बाबांच्या भक्तगणांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून आवर्जून दर्शन घ्यावे.
रविवार, दि. २८ जानेवारी २०२४ | सकाळी १०.३० ते १२.३० श्री सत्यनारायणाची महापूजा |
कार्यक्रमः | |
रविवार, दि. २८ जानेवारी ते बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ | पहाटे ५.३० ते ८.०० काकडआरती, समाधीपूजा, अभिषेक सकाळी ८.०० ते १२.३० सर्व भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र महारुद्र स्वाहाकार दुपारी १२.३० ते ३.०० आरती व महाप्रसाद दुपारी १.०० ते ४.०० भजने सायं. ४.०० ते ८.०० सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर आरती |
बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ | सकाळी ९.०० ते १२.०० ‘रक्तदान शिबीर’ १२० रक्तदात्यांचा रक्तदान संकल्प |
गुरुवार दि. १ फेब्रुवारी २०२४ | परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मदिन पहाटे ५.३० ते ८.०० काकडआरती, समाधीपूजा, जपानुष्ठान सकाळी ८.०० ते ९.०० भजने सकाळी ९.०० ते ११.३० समाधीस्थानी लघुरुद्र सकाळी ९.३० ते १२.०० जन्मोत्सव कीर्तन (ह.भ.प. श्री. भाऊ नाईक, रा. वेतोरे, ता. वेंगुर्ला ) दुपारी १२.०० परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्म सोहळा दुपारी १२.३० ते ३.०० आरती व महाप्रसाद सायं. ५.०० परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची उंट, घोडे तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक नंतर आरती. रात्रौ. १२ नंतर लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा महान पौराणिक ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘व्यंकटेश पद्मावती’ (संचालक: श्री. सिद्धेश कलिंगण) |
सांस्कृतिक कार्यक्रम | |
रविवार दि. २८ | दुपारी ३.३० ते ६.३० शाळा नं.३ कणकवली प्रस्तुत मुलांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सायं. ६.३० ते ७.३० आदर्श संगीत विद्यालय कणकवली (बबन कदम सर ) यांच्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय तबला वादन |
सोमवार दि.२९ | सायं.४.०० ते ५.०० सुनील पाडगांवकर, रा. मळगांव सावंतवाडी यांचा अभंग, नाट्य-भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम हवा नवा तो सूर सायं. ५.०० ते ७.३० धर्मानंद मनोहर नाईक रा. धारगळ-पेडणे पुरस्कृत अभंग, भाव-भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम श्री. रोहिदास परब, गोवा व सहकारी प्रस्तुत सूर निरागस हो |
मंगळवार दि. ३० | सायं. ४.०० ते ७.४५ श्री. पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा, गोवा प्रस्तुत दोन अंकी संगीत नाटक ययाती आणि देवयानी |
बुधवार दि. ३१ | सायं. ४.०० ते ७.४५ ॐ भवानी दशावतार नाट्य मंडळ राठीवडे, ता. मालवण यांचा महान पौराणिक दशावतारी नाटक |
बाबांच्या या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा