आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ अर्थात हिंदू पंचांगा नुसार माघ महिन्यातील चवथा दिवस म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायाचा जन्मोत्सव माघी गणेश चतुर्थी उत्सव मुंबई करीरोड पश्चिम विभागात पिंपळेश्वर कृपा बिल्डिंग मध्ये आज उत्साहाचे आणि आनंददायी मंगलमय वातावरण होते जवळ जवळ महिनाभर तयारी चालू असलेले आणि भक्तगण अगदी आतुरतेने वाट पहात होते त्या गणरायाचे “सावंतांच्या राजाचे” आगमन अतिशय प्रसन्न मुद्रा असलेली वरदहस्ते भाविकांना आशीर्वाद देणारी गणरायची मूर्ती आपल्या आसनावर विराजमान झाली.
अष्टविनायकाचा देखावा भक्तगणांनी अथक परिश्रम करून स्थापन केला असून त्यात ह्या गणरायाचे “सावंतांच्या राजाचे” दर्शन म्हणजे जणू दुग्धशर्करा योग. ब्राम्हण हस्ते सावंत कुटुंबीय यजमानांकडून गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यांनतर षोडशोपचारे पूजाविधी. आरती पंचारती झाल्यावर भाविकांना तीर्थ प्रसाद त्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाप्रसाद अशा प्रकारे भाविकांच्या प्रचंड गर्दीत विविध पद्धतीने प्रत्येकाचे आदरातिथ्य.
सायंकाळी यथाविधी पूजेनंतर पुन्हा महाआरती आणि त्यानंतर तीर्थ प्रसाद आणि पुन्हा प्रत्येकाला आवर्जून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे भाग्य या लाडक्या गणरायाच्या आज जन्मोत्सवा निमित्त सालाबाद प्रमाणे पहावयास मिळतो आणि खरच आपल्या पूर्वजांनी जे संस्कार केले त्याची जपणूक करून ते पुढील पिढी कडे पोहचविण्याचे महान कार्य या उत्सवानिमित्त सावंत कुटुंब तसेच इतर भक्तगनां कडून केल्याचे पहावयास मिळते.
तर अशा या लाडक्या गणरायाचे दर्शन अवश्य घ्या… गणपती बाप्पा मोरया…