श्री महाशिवरात्री महादेव शम्भो महादेवाची कोकण काशी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या “श्री क्षेत्र कुणकेश्वर” येथील यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे अर्थात प्रतिवर्षाप्रमाणे यंदा तमाम शिव भक्तांसाठी मार्च महिन्यात असून शुक्रवार, दि. ८ मार्च ते रविवार, ते दि. १० मार्च २०२४ या कालावधीमध्ये ‘श्री क्षेत्र कुणकेश्वर’ येथे महाशिवरात्री यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे.
रविवार, दि. १० मार्च रोजी पवित्र तीर्थस्नानाचा योग असून ‘दर्श अमावास्या महापर्वणी योग’ जुळून आला आहे. आपण या शुभ आणि मंगल महाउत्सवास उपस्थित राहून सहभागी व्हावे, हीच आमची सदिच्छा! अशा आशयाचे निमंत्रण देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री क्षेत्र कुणकेश्वर महाउत्सव २०२४ आपले नम्र, श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट – कुणकेश्वर, श्री कुणकेश्वर सेवा मंडळ – मुंबई, ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या तर्फे पहावयास मिळतात. येन केन प्रकारे कोणत्याही भक्ताला या पवित्र आणि मंगलमय उत्सवात सहभागी होता यावे आणि श्री महादेव कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन विविध कार्यक्रमात देखील सहभागी होता येईल.
श्री महाशिवरात्री यात्रा, श्री क्षेत्र कुणकेश्वर महाउत्सव २०२४, यांच्या माहितीनुसार शुक्रवार, दि. ८ मार्च २०२४ ते रविवार, दि. १० मार्च २०२४ पर्यंत अहोरात्र चालू असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठीक ठिकाणाहून भाविक येतात. यंदा श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील पवित्र तीर्थस्नान रविवार, दि. १० मार्च २०२४ दर्श अमावास्या दिवशी महापर्वणी योग असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी असणारच कारण प्रत्येकाला या शुभ योगावर पवित्र ठिकाणी मंगलमय वातावरणात तीर्थस्थानावर स्नान करून शंकर भोले नाथांचा आशीर्वाद घेण्याची तळमळ स्वस्थ बसू देणार नाही,
अशा या पवित्र तीर्थक्षेत्रावर अनेक आडी अडचणींना तोंड देत. प्रवासात होणाऱ्या त्रासाचीहि पर्वा न करता आवर्जून येणाऱ्या सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा.
अधिक वाचा : श्री कुणकेश्वर यात्रा महोत्सव महाशिवरात्री २०२३
You have written very beautifully sir….
Thank you…