मालवणी बोलीचो गोडवो ज्याका कळलो
तो मालवणीकडेच वळता
मराठी भाषा वळवूची तशी वळता
पण मालवणीचो ज्याका गंध आसा
त्याकाच ती कळता
याक मात्र खरा हा
आमचो मालवणी माणूस
मुळातच प्रेमळ आणि लाजाळू
दुसऱ्याची भाषा मोठेपणान बोलाक जाता
आणि आपली भाषा बोलाची येळ ईली की
मुग गिळान गप बसता
चार लोक एकठय ईले
कि त्यांचा एंडुगुंडु
कान लावन ऐकता
मात्र भावकीतलो कोणी जवळ ईलो
तर त्याका ‘काय कसं हाय’
असा देशी भाषेत ईचारता
ह्या सगळा आता थांबाक व्हया
मालवणी माणसानू
तुम्ही मालवणीतच बोलाक व्हया
आमची माय मालवणी
ह्या दाखवुकच व्हया
——- सत्यवान साटम
गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग.
फेसबुक लिंक