सिंधुदुर्गातल्या मातीत अनेक साहित्यिक जन्माला आले आहेत…. संपूर्ण जगाला या मातीने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. लाल मातीतील हे कलावंत प्रतिभावान आहेतच. माती पासून दूर असूनही त्यांनी या मातीशी असलेली नाळ कधीच न तोडता सातत्याने लिखित साहित्याचे जतन आणि संवर्धन आपल्या कलाकृतीतून साकारले आहे.. विविध शाळांना या साहित्यकृतीची जाणीव व्हावी. साहित्यातील महत्त्वाच्या पैलूंची जडणघडण शालेय जीवनात व विद्यार्थी दशेत व्हावी याकरिता जानवली गावातील कवी श्री सत्यवान सहदेव साटम यांनी लिहिलेल्या कवितांचा ग्रंथ… नाथ पै ज्ञानप्रबोधिनी करूळ प्रशालेस भेटरुपी देण्यात आला…… यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री विनोद नारायण मेस्त्री सर, श्री हेमंत अभिमन्यू कदम सर, श्री. सिद्धेश लक्ष्मण खटावकर सर,सौ रुचिका प्रभाकर गोसावी मॅडम, सौ सरिता सचिन ठाकूर, सौ अश्विनी अरुण नाईक साटम, सौ अमृता अनिल कुमठेकर, सौ वैशाली अमोलिक मांगले, सौ अस्मिता आनंद मोरजकर, शिक्षकेतर कर्मचारी श्री उत्तम गंगाराम तांबे, श्री अनिकेत श्रीकांत कर्णिक,पालक श्री तावडे इत्यादी उपस्थित होते
Related posts
Subscribe
0 Comments
Oldest