“जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” ६६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
श्री लिंगेश्वर पवणादेवी च्या आशीर्वादाने “जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” च्या वतीने ६६ वा वर्धापनदिन रविवारी दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी “दादर शारदाश्रम हॉल” येथे आयोजित करण्यात आला. जानवली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय श्री. अजित पवार ऊपसरपंच सन्माननीय श्री. किशोर राणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार मुंबई “दादर शारदाश्रम हॉल” मध्ये करण्यात आले. यावेळी संस्कृतिक, कार्यक्रम, मुलांचा गुणगौरव सोहळा, तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम दिमाखात पार पडला. यावेळी उपस्थित सन्माननीय माजी शिक्षणमंत्री श्री.दत्ताजी राणे, जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते, जानवली ग्रामस्थ, महिलां मंडळ सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई यांनी आयोजित केलेला वर्धापनदिन, विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम तसेच हळदीकुंकु समारंभ यासाठी आभार मानायचे तर कोणाचे मानायचे….
काल नव्वद वर्षाचे माजी शिक्षण मंत्री श्री.दत्ताजी राणे मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून येतात व मार्गदर्शन पर भाषण देतात त्यांचे…
ग्रामपंचायत जानवली मधील सगळे सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी ९०० किलोमीटरचा प्रवास करून केवळ चार तासाच्या कार्यक्रमासाठी स्वखर्चाने इथे आले त्यांचे …
कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रम निर्वीघ्न पार पडला. यामागे आमचे मंदिराचे विश्वस्त ज्यांनी देव लिंगेश्वर पावणादेवीकडे साकडे घातले व रखवाली दिली. यामुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्यांचे…
श्री चंद्रशेखर राणे वांगवडेवाडी यांनी शुगर फ्री चहा, फ्री मध्ये दिला आरोग्य विषयक माहिती दिली, त्यांचे आभार मानायचे….
जानवली ग्रामस्थ महिला मंडळ, मुंबई यांनी दाखवलेली एकी त्याची मेहनत त्याचे आभार मानायचे….
सौ स्वाती जयवंत राणे यांनी त्यांच्या परिचयातील आणलेल्या सौ ज्योती पांचाळ यांनी मार्गदर्शनपर भाषण केले त्यांचे आभार मानायचे…
सांस्कृतिक कार्यक्रम या लोकांनी यशस्वी केला ते आहेत.
श्री संतोष चंद्रकांत राणे.
कु. सुकन्या संतोष राणे.
श्री निलेश रंजन नाईक.
कु. आयुषी ज्ञानदीप राणे.
कु. स्वयंम संतोष राणे.
कु. श्रेय संतोष राणे.
कु आयुष अमित राणे. यांनी जबरदस्त परफॉर्मन्स करून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे…
संगीत खुर्ची स्पर्धा
सौ.अर्चना अनंत राणे.
सौ. अनिषा राणे.
कु. शर्वरी संजय राणे. यांनी गाजवली त्यांचे….
श्री अजित सखाराम पवार. सरपंच
श्री किशोर दौलत राणे. उपसरपंच
कु. प्रीती दिपक कदम.
सौ.सुवर्णा सु. मेस्त्री.
श्री अनुष्का अ. राणे.
सौ. राजश्री अशोक राणे.
सौ. दीक्षा दिनेश राणे.
कु. नितीन सुनील राणे.
कु. रमेश बाळाजी राणे.
श्री. दामोदर आ सावंत.
या सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे…
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम हा गुणवंत, यशवंत, किर्तीवंत व क्रीडावंत विद्यार्थ्यांनी गाजवला त्यांचे…
त्यांना शैक्षणिक निधी देणारे आमचे आश्रयदाते त्यांचे..
सरतेशेवटी यामध्ये सामाविष्ट ,सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही आभारी आहोत.
जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई हा एक पूल आहे. जो जानवलीकर मुंबईकरांचा प्रवास सुखद करतो.
“जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” अतिशय नियोजन बद्ध सुंदर कार्यक्रम खूप छान झाला.
पण या कार्यक्रमाला यशस्वी करणारे मुख्य सूत्रधार आपले लाडके श्री .प्रमोद राणे आहेत. यांच्या मार्गदर्शनाशिवाय एवढा मोठा कार्यक्रम करण शक्य नव्हत त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा ही मोठा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे त्यांचेही आभार उपस्थितांनी सोशियल मीडियावर देखील व्यक्त केले.