फोंडाघाटात स्वच्छतेचा एल्गार उत्स्फूर्त प्रतिसाद; पर्यटन स्थळ झाले चकाचक | Elgar spontaneous response to cleanliness in Phondaghat

swachata-abhiyaan-satyawan-satam

रविवारी सिंधुदुर्गवासीयांनी एकत्र येत फोंडाघाटात स्वच्छतेचा एल्गार केला. पर्यटन स्थळ चकाचक करण्यात आले. त्याशिवाय घाटातील रस्त्याच्या दुतर्फा असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला. रविवारी सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, फोंडाघाटच्या सरपंच सौ. संजना आग्रे, सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंता के. के. प्रभू, पत्रकार गणेश जेठे, मंडल अधिकारी दिलीप पाटील, फोंडाघाट कॉलेजचे प्रा. सुरवसे, प्रा. जगदीश राणे, प्रा. तायवाडे, सह्याद्री जीवरक्षक संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रिया टेमकर, ग्राम विकास अधिकारी विलास कोलते, पत्रकार मोहन पडवळ, संजय सावंत, तुषार नेवरेकर, सचिन राणे, गुरू सावंत, अनिल मेस्त्री, अनिल कामतेकर, दीपक इस्वलकर, नीलेश मेस्त्री, सत्यवान साटम, विजय जामदार, विश्वनाथ जाधव यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेताना स्वच्छतादूत. ही मोहीम राबवण्यात आली.

सुरुवातीला गणेश जेठे यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून मोहिमेला सुरुवात झाली. धबधब्याजवळचे पर्यटन स्थळ स्वच्छ करण्यात आले. तसेच घाटातील रस्त्याच्या दुतर्फा असलेले प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बाटल्या व काचेच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. वैभववाडी तालुक्यातील करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक संघटनेचे कार्यकर्ते आणि फोंडाघाट राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. फोंडाघाट ग्रामपंचायतीने कचरा गाडी उपलब्ध केली होती. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत, राजू पटेल, करुळमधील सहदेव जाधव, फोंडाघाट मधील उद्योजिका प्रिया नारकर, संजय नेरुरकर यांनी या मोहिमेला सहकार्य केले.

तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले की, या मोहिमेला इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे हे पाहून खूप आनंद वाटतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यातील पर्यटन स्थळे स्वच्छ असतील तर पुन्हा पुन्हा पर्यटक येतील आणि जिल्ह्याचा पर्यटन विकास होईल, असे मत व्यक्त केले.

स्रोत

पुढारी
फोंडाघाट : पुढारी वृत्तसेवा

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments