होळी आणि रंगपंचमी एक सण जो केवळ रंगांचा उत्सव नाही तर प्रेम, मैत्री आणि आनंदाचा उत्सव आहे. हे असे दिवस आहेत जेव्हा प्रत्येकजण आपले सर्व तणाव विसरून एकमेकांना रंग लावतत आणि एकत्र होळीचा आनंद घेतो.
होळी कथा
होळीमागे अनेक कथा आहेत, परंतु सर्वात प्रसिद्ध कथा भक्त प्रल्हाद आणि होलिकाची आहे. कथेनुसार, राजा हिरण्यकशिपू स्वतःला देव मानत होता आणि प्रत्येकाने त्याची पूजा करावी अशी त्याची इच्छा होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा फक्त भगवान विष्णूंवरच विश्वास ठेवत होता. यामुळे राजाने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला अग्नीत बसवण्यास सांगितले. होलिकेला वरदान होते की अग्नी तिला जाळू शकत नाही, पण प्रल्हादासोबत ती आगीत बसताच भगवान विष्णूच्या कृपेने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. तेव्हापासून होलिका दहनाची परंपरा सुरू झाली, जी होळीच्या दिवशी साजरी केली जाते. आणि धूलिवंदन अथवा रंगपंचमी दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करून साजरी केली जाते.
होळी एक सामूहिक सण
कोकणात अर्थात कित्येक सण सामूहिक रित्या साजरे केले जातात त्यात विशेषतः होळी हा आवर्जून स्मरणात राहणारा सण आहे किमान ५ ते १५ दिवस याची मजा घेऊन एकत्रित हा सण साजरा करतेवेळी एक पारंपरिक प्रथा समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची विचारधारा यात दिसून येते म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
होळीची मजा
होळीची सर्वात मोठी मजा एकत्र येऊन होळी साठी लाकूड फाटा व शेण्या रचून विधिवत त्याची पूजा करून पुरण पोळीचा नैवेध्य दाखवून होळीच्या आगीत नारळ अर्पण करून सभोवताली फेर धरून एकत्रित बोंब मारली जाते तसेच दुसऱ्या दिवशी सकाळपासून खेळल्या जाणाऱ्या त्याच्या रंगांमध्ये आहे. हे सर्व काही विशेषतः शहरात पाहावयास मिळते. लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत सर्वजण रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना पिचकारी, गुलाल आणि रंगांनी रंग देतात. विशेषत: मुलांसाठी, होळी रंगपंचमी हे एक साहस आणि मनोरंजनात्मक असे सार्वजनिक सण आहे—पाणी पिचकाऱ्यांनी पाणी शिंपडणे, फवारणे, फुग्यांसह अचानक हल्ला करणे आणि मित्रांसोबत मजा करणे!
गुढ्याची आणि भांगाची होळी
होळीच्या दिवशी फक्त रंगच नाही तर जेवणाचीही एक वेगळीच मजा असते. गुजिया, मालपुआ, दही वडा, थंडाई असे खास पदार्थ बहुतेक घरात, कार्यक्रमात बनवले जातात. आणि भांग थंडाईबद्दल बोलाल तर होळीची मजा द्विगुणित होते असे निदर्शनास येते!
मैत्री आणि प्रेमाचा सण
होळी हा केवळ सण नसून मैत्री आणि प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी शत्रूही एकमेकांना मिठी मारतात, नवीन नातेसंबंध सुरू होतात आणि जुने वैर मिटतात. कोणताही भेदभाव न करता आपण सर्व एक आहोत असा संदेश होळी देते.
होळी खेळणार का?
तुम्ही अजून होळीसाठी तयार नसाल तर पटकन तुमच्या पिचकारी, गुलाल आणि मित्रमैत्रिणी एकत्र करा, कारण…
आज होळी आहे!
Nice information
Thank you…