कबड्डीमध्ये वशिलेबाजांचीच चढाई मुंबईकर चढाईवीर प्रणय राणेवर अन्याय सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकूनही संभाव्य संघातून वगळले. या आशयाचे मेसेजेस आज कबड्डीच्या माहेरघर असलेलया लालबाग परळ येथील तमाम कबड्डी पट्टू, कबड्डी प्रेमींच्या सोशल मीडियावर प्रसारित झालेले पहायला मिळाले त्याचीच सामना ऑनलाईन वर प्रसिद्ध झालेली हि विशेष माहिती. जानवलीच्या प्रणय राणे याने प्रचंड मेहनत घेऊन स्वतःचे एक स्थान निर्माण केलेले आहे.
मुंबई असो किंवा महाराष्ट्र, कबड्डीला हळूहळू वशीलेबाजच पोखरून काढत असल्याचे समोर आले आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमधला गोंधळ थांबत नाही तोच छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत आपल्या चढाईने मुंबई शहरला जेतेपद मिळवून देणाऱ्या प्रणय राणे या धडाकेबाज चढाईपटूवर अन्याय झाल्याने पुन्हा एकदा कबड्डीत खेळाची नव्हे तर वशीले बाजांचीच चालते. हे जळजळीत सत्य उघडकीस आले आहे.
येत्या २१ ते २४ मार्चदरम्यान नगर येथे होत असलेल्या ७० व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या राज्याच्या संभाव्य संघात विविध जिल्ह्यातील २९ खेळाडू निवडण्यात आले आहेत. यात मुख्य जिल्ह्यातील सरासरी चार खेळाडू निवडले गेले आहेत. यात असे अनेक खेळाडू आहेत त्यांची राज्य निवड चाचणी असो किंवा नुकतीच झालेली छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा असो, यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या वशील्याच्या टोणग्यांनाही राज्य कबड्डी संघाच्या २९ सदस्यीय संभाव्य संघात स्थान देण्याचे पराक्रम निवड समितीने केले आहे. संभाव्य यादी पाहून पुन्हा प्रामाणिक कबड्डीपटूंची तळपायाची आग मस्तकात केली आहे.
निवडीसाठी आणखी काय हवे…?
छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत प्रणय राणेने तुफानी चढायांच्या जोरावर मुंबई शहरला जेतेपदाचा मुकूट जिंकून दिला होता. त्याने या स्पर्धेतील सहा सामन्यात जबरदस्त खेळ करत सर्वाधिक ६५ गुण कमावले होते. त्याच्या या खेळाच्या जोरावरच मुंबई शहरने जेतेपद जिंकले होते आणि तो स्वता सर्वोत्कृष्ट खेळाडूही ठरला होता. एवढेच नव्हे तर राज्य अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट चढाईपटूचा मान मिळविला होता. इतकी जबरदस्त कामगिरी असूनही हा धडाकेबाज चढाईपटू संभाव्य संघातही स्थान मिळवू शकला नाही. त्यामुळे राज्याच्या निवड समितीला संघात निवडण्यासाठी चांगल्या खेळाशिवाय आणखी काही लागते का ? असा प्रश्न कबड्डीप्रेमीना पडला आहे.
संभाव्य संघाची यादी कुणाकडेच नाही…
राज्याच्या २९ खेळाडूंची संभाव्य यादी मिळावी म्हणून राज्य कबड्डीच्या पदाधिकाऱ्यांपासून निवड समिती सदस्य असो किंवा सराव शिबीराचे समन्वयक या सर्वांशी संपर्क साधला, पण एकाकडूनही संभाव्य खेळाडूंची यादी मिळू शकली नाही. संभाव्य खेळाडूंची यादी लपवण्यात नेमकं काय दडलंय, हे मात्र कळू शकले नाही.
यादी पाहून धक्का बसला जोरदार कामगिरीनंतर माझी राज्य
संघात निवड होणार, याचा मला विश्वास होता पण काल जेव्हा मी यादी पाहिली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. इतका जबरदस्त खेळ केल्यानंतरही आपली संघात निवड होत नसेल तर याला काय म्हणावे, हेच कळत नाही. पण माझ्यापेक्षा वाइट खेळलेले आणि वाईट खेळणारे संघात पाहून तुमची कामगिरीच तुम्हाला न्याय देते असे नाही. हे सत्य मीसुद्धा जाणले आहे. त्यामुळे मला आता कबड्डीच्या दादांकडेच दाद मागावी लागणार आहे.
स्रोत (Source):