गौरव राणे मुक्काम पोष्ट जानवली सकल वाडी येथील एक मेहनती खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने कबड्डी सारख्या खेळामध्ये प्रवेश मिळविला सध्या तो आतंरराष्ट्रीय टीम साठी खेळला असून दिवसागणिक त्याची प्रगती उत्तमरीत्या प्रगती पथावर आहे.
गौरव राणे याने या खेळात आपला चांगलाच जम बसविला असून अनेक मोठं मोठया नामांकित खेळाडूंसोबत त्याचा खेळ पाहताना जानवली गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात डोलताना दिसल्याचे दिसून येते.
गौरवचा हा प्रवास कष्टदायी असला तरी त्याची जिद्द आणि चिकाटी नक्कीच त्याला आयुष्यात अनेक संधी उपलब्ध करून देईल. आजच्या या स्पर्धात्मक युगात स्वतःला टिकवण्या साठी तसेच स्वतःला त्या योग्यते साठी पात्र बनविण्यासाठी फारच प्रयत्नशील तसेच तंदुरुस्त रहावे लागते आणि त्याच्या खेळावरून ते प्रत्यक्षात पाहावयास मिळते.
गौरव राणेंच्या या कर्तृत्वाचा आपल्या गावातील तरुण पिढीने आदर्श नक्कीच डोळ्यासमोर ठेऊन आपल्या आवडी निवडी नुसार कोणत्याही क्षेत्रात आवश्यक परिश्रम करून आपणास वाव मिळविण्याचा करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या आई वडिलांसोबत आपल्या कुळाचे आपल्या गावाचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करावा देव लिंगेश्वर पावनाईचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत.
आपणा सर्वांकडून गौरव राणेला खूप खूप शुभेच्छा त्याने असेच पुढील आयुष्यात उत्तमोत्तम कामगिरी करून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगला विजय प्राप्त करून जास्तीत जास्त पारितोषिके, मान सन्मान मिळवून त्याचा प्रवास सुलभ व सुखकर व्हावा हे मनोदय व्यक्त करून त्याला पुन्हा एकदा पुढील करियर करिता अभीष्टचिंतन तसेच खूप खूप शुभेच्छा.