ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून आपली ओळख निर्माण केलेला सध्या मुंबईत वास्तव्यास असलेला आणि विशेषतः जानवली येथील गावठण वाडीतील उत्तम खेळाडू म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केलेली असून सातत्याने विविध स्पर्धांमध्ये विविध ठिकाणी विविध स्तरांवर सहभागी होऊन विजयश्री प्राप्त करणारा हा खेळाडू आहे. जानवली येथील गावठण वाडीतील कै. ज्ञानदेव प्रताप साटम यांचे थोरले चिरंजीव श्री. प्रविण ज्ञानदेव साटम यांचा हा चिरंजीव अगदी लहानपणापासून नित्यनेमाने सराव करणे आणि सातत्य, आपल्या क्षेत्राची आवड तसेच त्यासाठी दिलेले योगदान हि त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि ती त्याच्या आजपर्यंतच्या विजयश्रीच्या प्रवासात सातत्याने दिसून येते.
नुकताच त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता टिकवून ठेवली असून आपल्या कारकिर्दी मध्ये अजून एक विजयाची नोंद केली आहे. त्याने अर्थात ओम साटमने नुकतेच ४x१०० मेडले रिले अंडर १७ बॉईज मध्ये सुवर्णपदक मिळवले (दिल्ली येथे डीएसओमध्ये महाराष्ट्र संघाचा नवा मीन रेकॉर्ड). दिल्ली सारख्या देशाच्या केंद्रस्थानी यशश्री प्राप्त करून त्याने जानवली गावाचे नाव मोठे केले आहे असे हे त्याचे यशस्वी प्रयत्न निश्चितच इतरांना देखील प्रेरणा देतील.
आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल ओम साटमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा…