आज दिनांक 26 जानेवारी रोजी ठाणे येथे मारोतराव शिंदे तरुण तलावावर नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळवणारा कुमार ओम साटम याचा गुणगौरव आमदार श्री निरंजन डावखरे साहेब व आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ठाणे पालिका क्रीडा आयुक्त सौ.मिनल पालांडे मॅडम व व्यवस्थापक श्री रवि काळे सर व शार्क क्लबचे (कळवा)क्रीडा मार्गदर्शक ,शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री सौरभ सांगवेकर उपस्थित होते.
विशेषतः अशा प्रकारे एखाद्या खेळाडूचे कौतुक होणे हि खरोखरच अभिमानाची बाब आहे किंबहुना त्या खळाडूला प्रोत्सहन तर मिळतेच साहजिकच इतर खेळाडू देखील प्रेरणा घेऊन प्रयत्नांची पराकाष्टा करतात.
ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून आपली ओळख निर्माण केलेला जानवली येथील गावठण वाडीतील उत्तम खेळाडू असून सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजयश्री प्राप्त करणारा हा खेळाडू आहे. सध्या विविध स्तरावर त्याचे कौतुक केले जात आहे. जानवली येथील गावठण वाडीतील प्रविण साटम यांचा हा चिरंजीव नित्यनेमाने सराव करणे, सातत्य आणि चिकाटी हि त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि ती त्याच्या आजपर्यंतच्या यशोगाथेमध्ये सातत्याने दिसून येते.
आतापर्यंतच्या त्याच्या कामगिरीबद्दल त्याचे, त्याच्या गुरूंचे आणि पालकांचे देखील हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…